कोरफड : माहिती मराठी | Aloe Vera Information, Benefits in Marathi

You are currently viewing कोरफड : माहिती मराठी | Aloe Vera Information, Benefits in Marathi

Aloe Vera म्हणजे कोरफड एक औषधी वनस्पती आहे . ह्या पासून अनेक आयुर्वेद औषधे बनवली जातात.कुमारी म्हणून ओळखली जाणारी कोरफड (Aloe Vera) कायम तरुण असते ही वनस्पती माणसाला तरुण  ठेवण्यास मदत करते. औषधी गुणधर्मांमुळे, बरेच लोक कोरफडीचा आहारात (Diet) देखील समावेश करतात तसेच कोरफडीमध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट आणि ॲंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे त्याचा वापर औषधामध्ये सुद्धा केला जातो. घराच्या बाल्कनीत सुद्धा दिसणाऱ्या ह्या साध्या वनस्पतीचे खूप फायदे आहेत. चला तर मग कोरफडीचे फायदे (Benefits of Aloe Vera) पाहुयात.

Benefits of Aloe Vera | कोरफडीचे फायदे

  • चेहरा उजळ करण्यासाठी कोरफडीच्या गराचा उपयोग होतो.
  • कोरफडीत आढळणारे अँटिऑक्सिडंट पॉलीफेनॉलआपल्या शरीरातील जखमा भरून काढण्यास मदत करते त्यामुळे हेय जखमांवर सुद्धा उपयुक्त आहे.
  • कोरफडमध्ये असणारी अमीनो ऍसीड आणि बी1, बी2, बी6 आणि सी जीवनसत्त्वे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
  • पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे म्हणून रोज एक चमचा त्याचे सेवन करावे.
  • कोरफडीचे सेवन केल्याने पोटातील जळजळ शांत होते, आराम मिळतो.
  • रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरफडीचे सेवन करू शकता.
  • कोरफडीचा रस हा तोंडातील अल्सर बरे करण्यास प्रभावी ठरतो.कोरफडी मधील ॲंटीबॅक्टेरियल आणि ॲंटी-फंगल गुणधर्म तोंडातील जंतू दूर ठेवण्यास मदत करतात.
  • लहान मुलांचा कफ बारा करण्यासाठी देखील कोरफड वापरली जाते. 

टीप- या पोस्ट मध्ये  देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Leave a Reply