आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat) – संपूर्ण माहिती – Ayushman Bharat Yojana In Marathi

You are currently viewing आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat) – संपूर्ण माहिती – Ayushman Bharat Yojana In Marathi

काय आहे आयुष्यमान भारत योजना?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी २०१८ पासून  केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Yojana) राबविली जात आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा उपलब्ध करून देते. 

आयुष्यमान (Ayushman Bharat) योजनेचा लाभ कोण घेवू शकते, लाभार्थ्यांची पात्रता कशी निश्चित होते, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड म्हणजे नक्की काय, ते कसे मिळवायचे याची संपूर्ण माहिती आपण आता घेऊयात.

आयुष्यमान भारत योजनेचे उदिष्ट – (Ayushman Bharat Yojana In Marathi)

काय आहे आयुष्यमान भारत योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ योजनेची (आयुष्मान भारत योजना ) Ayushman Bharat घोषणा पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर २०१९ पासून देशभर लागू केली. गरीब, उपेक्षित कुटूंब व शहरी गरीब कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे हेय ह्यामागचे उद्धिष्ट आहे.

या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता तसेच या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते.

योजनेचे नावप्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat)
योजना कुणी सुरु केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
योजना कधी सुरु झाली14-04-2018
लाभार्थीभारताचे नागरिक
उद्दिष्ट५ लाख रुपयांचा आरोग्य विमा
अधिकृत वेबसाइटhttps://pmjay.gov.in/

ह्या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?

एसईसीसीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील D1, D2, D3, D4, D5 आणि D7 कॅटेगरीतील लोक आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेचा लाभ घेऊ शकतात. सरकारने ही योजना दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी सुरू केली आहे. आदिवासी (SC/ST)  निराधार, भिक्षा मागणारी व्यक्ती, मजूर इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अर्ज कसा करावा – (आयुष्यमान भारत योजना)

  • आयुष्यमान भारत (Ayushman Bharat) योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला mera.pmjay.gov.in भेट द्या.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल, तो दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
  • तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती नोंदवा.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करा व पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.
  • त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत तुमचे हेल्थ कार्ड तयार होईल.
  • याशिवाय, तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन सुद्धा हे कार्ड काढू शकता.

आयुष्यमान भारत (Ayushman Bharat) योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा

  • वैद्यकीय तपासणी आणि उपचार
  • औषधे आणि वैद्यकीय उपयोगी वस्तू
  • वैद्यकीय चाचण्या / तपासण्या 
  • वैद्यकीय मलमपट्टी सेवा
  • आवास लाभ
  • अन्न सेवा
  • उपचारादरम्यान उद्भवलेल्या कॉम्प्लिकेशन्स चे उपचार
  • रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांपर्यंत फॉलो अप

आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेअंतर्गत कोणत्या आजारांवर उपचार मिळतात ?

  • कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग
  • प्रोस्टेट कैंसर
  • करॉटिड एनजीओ प्लास्टि
  • Skull base सर्जरी
  • डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट
  • Pulmonary व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट
  • इंटिरियर स्पाइन फिक्सेशन
  • Laryngopharyngectomy
  • टिश्यू एक्सपेंडर

Ayushman Bharat योजनेअंतर्गत ह्या कागदपत्रांची आवश्यकता

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • इनकम सर्टिफिकेट
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो

ह्या योजनेची (Ayushman Bharat) अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता

Leave a Reply