देव ज्यांना रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो त्यांना तो मैत्रीच्या नात्यात बांधतो असे म्हणतात. आपल्या आयुष्यात मित्र मैत्रिणींना एक वेगळे स्थान असते त्यामुळे त्यांचा वाढदिवस देखील आपल्यासाठी खास असतो. त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आपल्या कुटुंबानंतर आपल्याला मित्र मैत्रिणी जास्ती जवळचे असतात. प्रत्येक महिन्यात कुठल्या ना कुठल्या मित्रांचे वाढदिवस येतात तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी , स्टेटस ठेवण्यासाठी नवीन शुभेच्छा घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया जिवलग मित्रांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday Wishes For Friend in Marathi
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सर्व स्वप्न साकार व्हावीत
आजचा वाढदिवस अनमोल क्षणांची आठवण ठरावी
या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या मित्राच्या जिवनात
कधीही दुःख येऊ नये,
सदैव हसत खेळत सुख
आणि आंनद जीवनात नांदो.
हीच माझी इच्छा
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुझा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुझ्या पदरात पडत राहो
तुझा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा
तु माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र,
आधार आणि मार्गदर्शक आहेस.
माझ्या सर्व स्वप्नांच्या प्राप्तीसाठी
ज्या प्रकारे तु मला साथ दिली
त्याप्रमाणे मी नेहमीच तुझ्या सोबत राहीन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जल्लोष आहे साऱ्या गावाचा
कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रत्येकाच्या जीवनात काही खास
मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा
अशा जिवाभावाच्या मित्राला
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !
सूर्यासारखी तेजस्वी हो.
चंद्रासारखी शीतल हो.
फुलासारखी मोहक हो.
कुबेरासारखी धनवान हो.
माता सरस्वती सारखी विव्दान हो.
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तु करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुमच्या नवनविन स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात जवळच्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात हात न सोडणे
म्हणजेच मैत्री होय..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!
नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस,
कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस
सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
फुलांनी अमृत पेय पाठविले,
सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे
झेप अशी घे की,
पहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यात.
आकाशाला अशी गवसणी घाल की, पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळव की, सागर अचंबित व्हावा.
इतकी प्रगती कर की, काळ ही पाहत राहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने, ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लक्ख प्रकाश, तू चोहीकडे पसरव.
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मात देखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
यशस्वी हो, औक्षवंत हो
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
कितीही काहीही होवो,
तुझी माझी साथ कधीही न तुटो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हसणारी आणि हसवणारी
रडणारी आणि रडवणारी
लाडक्या मैत्रिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ही तुझ्या उत्तम आयुष्याची आणि वर्षाची सुरूवात असावी
ही सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला ह्या शुभेच्छांचा नक्की उपयोग होईल. अशाच नवीन पोस्ट साठी वाचत राहा