चिमणी – मराठी कविता |  जागतिक चिमणी दिनानिमित्त नवीन कविता 

You are currently viewing चिमणी – मराठी कविता |  जागतिक चिमणी दिनानिमित्त नवीन कविता 

आजकाल चिमण्या कुठे दिसेनाश्या झाल्या आहेत. २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. चिमणी संवर्धनासाठी ठीक ठिकाणी  अनेक उपक्रम आयोजित केले जातात. जागतिक चिमणी दिनानिमित्त चिऊताई साठी एक मराठी कविता घेऊन आलो आहोत.

चिऊताई चिऊताई

हरवलीस ग कुठे ???

शोधले खूप तुला

पण सापडलीस नाही कुठे…

चिवचिवाट तुझा आता

मोबाईल मध्ये ऐकतो…

माहित नाही आता

तुला पुन्हा कधी पाहतो…

स्वार्थासाठी आमच्या

तुझं जगणं आम्ही हिसकावलं…

तुझं घर, तुझी पिल्लं

आता काहीच नाही राहील…

गोष्टीतली चिऊताई म्हणून तू

गोष्टीतच नको राहू…

तुझ्यासाठी आता आम्ही

तू सांगशील ते करू…

अंगण नसले जरी तरी

खिडकीत पाणी आणि दाणे ठेऊ…

पिल्लांसाठी तुझ्या

छोटे घर बांधून देऊ …

प्रदूषणाचा सुद्धाआता

तुला त्रास काही होणार नाही…

पतंगांच्या मांज्याने

इजा हि तुला होणार नाही…

रुसवा तुझा हा

सोडून दे…

परतून पुन्हा तू

घरी ये…

चिऊताई  परतून पुन्हा तू

घरी ये…

मिनल राणे  (मिनल सुभाष )

Leave a Reply