मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव म्हणजेच दत्त जयंती साजरी केली जाते. ह्या वर्षी ती मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी आहे.
दत्त म्हणजे काय
दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे. दत्तात्रयांच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाते.
दत्त जन्म कथा | Datta Jayanti Story in Marathi
श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. त्यातलीच एका कथेप्रमाणे अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि दत्तगुरु चा जन्म झाला.
दत्त जयंती पूजा पद्धत
दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो. ज्यात पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात. तसेच काही ठिकाणी दुपारी बारावाजता किंवा सायंकाळी सहा वाजता दत्तजन्म केला जातो. मंदिरामधे भजन किर्तन देखील होते.‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’’ असा नामजप करण्यात येतो
दत्ताला सात किंवा सातच्या पटीत जाई आणि निशिगंध हे फुलं वाहावे. फुलांचे देठ देवाकडे करून ती त्यांना वहावीत. चंदन, केवडा, चमेली, जाई किंवा अंबर या उदबत्तीने दत्ताला ओवाळावे.
दत्ताच्या चोवीस गुरूंची नावे
- पृथ्वी
- पाणी
- वायू
- अग्नी
- आकाश
- सूर्य
- चंद्र
- समुद्र
- अजगर
- कपोत
- पतंग
- मधमाशी
- हत्ती
- भ्रमर
- मृग
- मत्स्य
- पिंगळा वैश्य
- टिटवी
- बालक
- कंकण
- शरकर्ता
- सर्प
- कोळी
- पेशकार
दत्ताचे प्रमुख अवतार
- श्रीपाद श्रीवल्लभ
- श्री नृसिंह सरस्वती
- श्री माणिकप्रभु
- श्री स्वामी समर्थ
- श्री साईबाबा
- श्री भालचंद्र महाराज
दत्तात्रेयांचे अंशअंशात्मक अवतार
योगिराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगिजनवल्लभ, लीलाविश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त, श्रीमायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्यामकमलनयन.
दत्त आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।
श्रीदत्त अथर्वशीर्ष
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूताय दिगम्बरायविधिहरिहराय आदितत्त्वाय आदिशक्तये ॥ १॥
त्वं चराचरात्मकः सर्वव्यापी सर्वसाक्षी त्वं दिक्कालातीतः त्वं द्वन्द्वातीतः ॥ २॥
त्वं विश्वात्मकः त्वं विश्वाधारः विश्वेशः विश्वनाथः त्वं विश्वनाटकसूत्रधारः त्वमेव केवलं कर्तासि त्वं अकर्तासि च नित्यम् ॥ ३॥
त्वं आनन्दमयः ध्यानगम्यः त्वं आत्मानन्दः त्वं परमानन्दः त्वं सच्चिदानन्दःत्वमेव चैतन्यः चैतन्यदत्तात्रेयः ॐ चैतन्यदत्तात्रेयाय नमः ॥ ४॥
त्वं भक्तवत्सलः भक्ततारकः भक्तरक्षकः दयाघनः भजनप्रियः त्वं पतितपावनः करुणाकरः भवभयहरः ॥ ५॥
त्वं भक्तकारणसम्भूतः अत्रिसुतः अनसूयात्मजः त्वं श्रीपादश्रीवल्लभः त्वं गाणगग्रामनिवासी श्रीमन्नृसिंहसरस्वती त्वं श्रीनृसिंहभानः अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थः त्वं करवीरनिवासी परमसद्गुरु श्रीकृष्णसरस्वती त्वं श्रीसद्गुरु माधवसरस्वती ॥ ६॥
त्वं स्मर्तृगामी श्रीगुरूदत्तः शरणागतोऽस्मि त्वाम् । दीने आर्ते मयि दयां कुरु तव एकमात्रदृष्टिक्षेपः दुरितक्षयकारकः ।हे भगवन्, वरददत्तात्रेय, मामुद्धर, मामुद्धर, मामुद्धर इति प्रार्थयामि । ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ७॥॥
ॐ दिगम्बराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ||