30+ Hand Picked Best Funny Ukhane in Marathi | उखाणे मराठी कॉमेडी

You are currently viewing 30+ Hand Picked Best Funny Ukhane in Marathi | उखाणे मराठी कॉमेडी

Funny Marathi Ukhane – आपल्या संस्कृती मध्ये उखाणे घ्यायची पद्धत आहे. हे उखाणे जर विनोदी असतील तर ?? दुसर्यांना आनंद  देण्यासाठी आणि कार्यक्रमात अंडी वातावरण निर्मण करण्यासाठी मजेशीर उखाणे तुम्ही घेऊ शकता. असेच  मजेशीर उखाणे (Funny Marathi Ukhane for female & male ) आज आम्ही घेऊन आलो आहोत.

Funny Marathi Ukhane for Female 

 नाही वाटत मला पाल, कॉक्रोच ची भीती, 

…….. आहेत माझे कबीर सिंग, 

आणि मी त्यांची प्रिती.

संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा,

मी केला पसारा तर तो, 

________ रावांनी आवरायचा.

सोसता सोसेना हा, संसाराचा ताप,

________ राव अजूनही सुधरले नाहीत, 

होऊन २ मुलांचे बाप.

हळदीमध्ये पाहुणे पिऊन, झाले आहेत टाईट,

……..राव कमी प्या, पोट वाढल आहे, 

आता जीन्स होईल टाईट.

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कव्हर

…… रावांचे नाव घेते 

….. लव्हर

तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,

______रावांना आवडतात, गरम मटण वडे

कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,

________ राव होते माझ्यावर  घायल

प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,

पण_______रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास

डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया

….. रावांना पहिल्यांदा बघताच 

झाला मला लवेरिया

बागेत बाग राणीचा बाग…अन्

 ……रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!

सुंदर अशा हरिणीचे 

इवले इवले पाय

…. राव अजून आले नाहीत

पिऊन पडले कि काय

पहाटेला करावी देवाची पूजा

… रावांच्या जीवावर करते मी मजा

गोव्यावरूनआणले फेणी आणि काजू

… रावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू

चांदीच्या ताटात फणसाचे गरे…..

 राव दिसतात बरे पण वागतीला  तेव्हा खरे

काचेच्या ग्लासात कोकम सरबत

…. रावांशिवाय मला नाही करमत

जीवन आहे एक अनमोल ठेवा,

….. राव आणतात नेहमी सुकामेवा.

प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी,

…… राव आहेत, एक नंबर चे छपरी.

बोलणे आहे ह्यांचे, मधापेक्षा गोड, 

…… राव काढतात नेहमी, मुलींची खोड.

छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा,

_____ राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा

आंब्यामध्ये लोकप्रिय आहे, हापूस आंबा,

______ च नाव घेते, सगळ्यांनी थांबा.

नाग पंचमिला नाग, प्यायला येतो दूध,

______ राव पिऊन आले कि, नसते त्यांना कसली सुध.

बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू,

_______ राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू.

उष्णता खूप वाढली म्ह्णून, ह्यांनी आणली कुल्फी,

.…… रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी.

लग्नात मागितला हुंडा एक खोक्का]

….. रावांचे नाव घेते. 

कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का

खुर्चीत खुर्च्या, प्लास्टिकच्या खुर्च्या,

_______ रावांच्या बहिणी, जशा खुरासणी मिर्च्या.

Funny Marathi Ukhane for Male

स्टुलावर स्टूल छत्तीस स्टूल

….. माझी ब्युटीफुल

शंकराच्या पिंडीला 

नागोबाचा वेढा

…माझी म्ह्स

मी तिचा रेडा

पुरणपोळीवर तूप टाकतो साजूक

हि आमची फारच नाजूक

एक बाटली दोन ग्लास,

माझी बायको फर्स्ट क्लास

रनवे वर 

प्लॅन धावतात  फास्ट

… इस माय फर्स्ट अँड लास्ट

खोक्यात खोका टिवी चा खोका,

….. माझी मांजर आणि मी तिचा बोका

स्वयंपाकात आहे सुगरण व्यवहारात आहे कुशल, 

नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

ठाण्याच्या मैदानात खेळात होतो क्रिकेट

….. पाहिलं आणि पडली माझी विकेट

 आणि माझं नातं, 

आंबा कैरीची फोड, 

आंबट वाटलं आधी जरी, 

पिकल्यावर मात्र गोड.

Leave a Reply