आपल्या दिवसाची सुरवात हि चांगल्या विचारांनी झाली तर आपला दिवस हि चांगला जातो. सकाळी उठल्यावर सर्व प्रथम आपण मोबाईल हातात घेतो अशा वेळी काही चांगले वाचन आपल्याला गरजेचं असते, त्याच प्रमाणे आपण इतरांना चांगले विचार पाठवून त्यांची सकाळ सुद्धा शुभ करू शकतो. ह्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर, प्रेरणादायी शुभेच्छा. तुम्ही तुमच्या प्रिजनांना सकाळच्या शुभेच्छा पाठवून त्यांना चांगल्या दिवसासाठी शुभेच्छा देऊ शकता. सकाळ सोबत रात्रीचे विचार आणि शुभेच्छा (Good Night Messages in Marathi) महत्वाच्या असतात. चांगले विचार करणे, चांगले वाचणे महत्वाचे असते तेच खरे आनंदी जीवनाचे रहस्य आहे.
New Good Morning Messages in Marathi
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले काम करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले होणार असते…
शुभ सकाळ!
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
शुभ सकाळ!
उद्या काय होईल माहित नसते
म्हणून आजचा दिवस आनंदात जगणे
हेच आपल्या हातात असते
शुभ सकाळ!
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
शुभ सकाळ!
आवडतं मला त्या लोकांना सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुध्दा माझ्या मनाच्या जवळ आहे.
शुभ सकाळ!
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
शुभ सकाळ!
ठाम राहायला शिका
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
शुभ सकाळ!
माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर
नसते तर ते चांगल्या विचारावर असते
शुभ सकाळ!
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
यशस्वी होण्याचा प्रवास मनातून सुरू होतो आणि
कृतीचं बळ मिळून ते मोहरत, प्रयन्त्नची पराकाष्ठा
केल्यावर यश मिळत,उठा आजचा दिवस आपला आहे
शुभ सकाळ
Good Morning Quotes in Marathi
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
सुप्रभात
क्षमा ही चांगली शक्ति आहे,
विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे,
आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
सुप्रभात
आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही
सुप्रभात
आयुष्यात लोक काय म्हणतील
याचा विचार कधीच करू नका..
कारण
आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
सुप्रभात
समाधान आपल्या मानण्यावर असत
बाकी अपेक्षांचं ओझं आयुष्यभर असते
सुप्रभात
कोण काय बोलते ह्याचा विचार
करत नाही राहायचा
आपण आपले काम करत राहायचं
सुप्रभात
चांगलेपणाचा दिखावा करू नये
पारखणारा तर आपल्याला
वरून पाहताच असतो
सुप्रभात
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
सुप्रभात
“आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही !
सुप्रभात
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत जाऊ नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते
सुप्रभात
Good Morning Status in Marathi
चांगली कार्ये, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी ध्यानात राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
आयुष्य खूप सुंदर आहे,
उतुंग भरारी मारा,
ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला
पण तुमचा हेवा वाटला पाहिजे
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
वयाचंं काहिच देणंघेणं नसतंं.
जिथे विचार जुळतात तिथेच
खरी मैत्री होते…!
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
काळ कसोटीचा आहे…
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे..
आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या…
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
तुमची विचारसरणी च तुम्हाला मोठं बनवते !!
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही
आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाही
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा
कोणास ठाऊक आपले हसणे बघून
जगात असेल
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
जे तुम्ही दुसर्याला द्याल
तेच तुम्हाला परत मिळेल
मग ते सुख असो किंवा दुःख
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो
Good Morning SMS in Marathi
प्रत्येक दुखण्यावर हॉस्पिटलमध्ये
उपचार होतात असे नाही…
काही आजार कुटुंब आणि
मित्र मंडळी सोबत वेळ घालवल्यावर
हि बरे होतात
गुड मॉर्निंग
जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे,
ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे,
ती गमावू नका.
गुड मॉर्निंग
आपल्यासाठी कोणी नसले तरी
आपण दुसऱ्यांसाठी असावं
गुड मॉर्निंग
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणसं जपा
गुड मॉर्निंग
कोकिळेच्या मधुर आवाजाने
फुलाच्या सुगंधाने
सूर्याच्या कोवळ्या किरणांनी
हि सकाळ आपले स्वागत करत आहे
गुड मॉर्निंग
नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते
गुड मॉर्निंग
बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये
गुड मॉर्निंग
आनंद
हसायला शिकवतो
आणि
समाधान
जगायला शिकवतं.
गुड मॉर्निंग
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर देण असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि नव्या ध्येयाची सुरुवात असते…
गुड मॉर्निंग
अनुभव माणसाचा खरा शिक्षक आहे
तो खूप गोष्टी शिकवून जातो
मग तो अनुभव चांगला असो किंवा वाईट
गुड मॉर्निंग
Good Morning Status in Marathi
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात
आपला दिवस छान जावो
आपण सदैव निरोगी,
आनंदी आणि
समाधानी रहावे
हीच सदिच्छा.
आपला दिवस छान जावो
सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
आपला दिवस छान जावो
प्रगती पथावर जाणाऱ्या रस्त्यावर फक्त
स्वतः वर आत्मविश्वास असलेले
वाटसरू चालतात
आपला दिवस छान जावो
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात
आपला दिवस छान जावो
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
आपला दिवस छान जावो
प्रत्येकाचा “आदर ” करणे हा आपल्या स्वभावातला
एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक
आहे ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते
आपला दिवस छान जावो
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….
आपला दिवस छान जावो
आपलं कधींच काही चुकत नाहीं
ही भावनांच माणसाला
नवीन अनुभव घ्यायला बळ देते
आपला दिवस छान जावो
स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
आपला दिवस छान जावो
Good Morning Wishes in Marathi
परिस्थिती आहे तशी स्विकारणे
हेच आनंदाचे गुपित आहे
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
“कष्ट” आणि “ मेहनत” एवढ्या शांतपणे करायचं की,
आवाज फक्त आपल्या “यशाचं” घुमला पाहिजे.
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो
त्याचे नाव अहंकार… आणि
नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा
देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार…!!
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
स्पष्ट बोला पण असे बोला
कि समोरच्याला कष्ट होणार नाही
अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
जर निभावून घेण्याची इच्छा दोन्ही बाजूंनी असेल तर
कोणताही संबंध अयशस्वी होणार नाही.
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे.
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा नाही मिळत.
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल
तर अपयश पचविण्यास शिका
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
एक आस, एक विसावा,, तुमचा मेसेज रोज दिसावा, ,
आणि आयुष्यात तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांचा सहवास,,
कायम असावा..!!!
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे
गुड मॉर्निंग
आपला दिवस छान जावो
Latest Good Morning Quotes in Marathi
आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही
असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान “ स्मित हास्य”
असू द्या खरंच हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खूपच मौल्यवान आहे
शुभ सकाळ
यश हे सोपे
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते
पण समाधान हे महाकठीण
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते
शुभ सकाळ
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
शुभ सकाळ
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो
शुभ सकाळ
साखरेची गोडी सेकंदच राहते पण
माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर करून जाते
शुभ सकाळ
पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची
पलटणारी पानं ही खुप काही शिकवून जातात
शुभ सकाळ
विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते
शुभ सकाळ
कुणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा..
शुभ सकाळ
दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं सुख
कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही.
शुभ सकाळ
जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावरआनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही
शुभ सकाळ
Good Morning Thoughts in Marathi
आयुष्य खूप सुंदर आहे,
उतुंग भरारी मारा,
ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला
पण तुमचा हेवा वाटला पाहिजे
इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत
सुप्रभात
भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…कोण ती पचवायला!
सुप्रभात
जीवन म्हणजे ज्यांच्या असण्याने जगण्याला अर्थ असतो
आणि त्यांच्या नसण्याने नेहमी एक पोकळी जाणवते
सुप्रभात
भूमिती मधील प्रमेया प्रमाणे तुम्ही आयुष्यातील उत्तरं
शोधत बसता आणि आयुष्य अवघड करून दुःखी होता
सुप्रभात
कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
सुप्रभात
आपलं कधींच काही चुकत नाहीं ही भावनांच माणसाला
नवीन अनुभव घ्यायला बळ देते
सुप्रभात
दरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही,
विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल
सुप्रभात
बोलणी फिस्कटली की व्यवहार फिस्कटतात
प्रेम मात्र विस्कटत नाहीं ते अबाधित राहतं
सुप्रभात
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
सुप्रभात
लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले
सुप्रभात
Good Morning Marathi Suvichar
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
शिव सकाळ
दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका…
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो
शिव सकाळ
आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत,
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे
शिव सकाळ
चूक नसतांनाही केवळ
वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार
हे संयमाचे फार मोठं प्रतीक आहे
शिव सकाळ
भावनांचा अन वेदनांचा
कधीच हिशोब लावता येत नाही,
त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात
शिव सकाळ
पहाटे प्राजक्तासारखे उमलून,
निशिगंधासारखे सुगंधित होत जावे !
सुगंधित आनंदाच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे
शिव सकाळ
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे
शिव सकाळ
नातं आपुलकीचं असावं
एकमेकांना जपणारं
असावं… जवळ असो
वा लांब नेहमी आठवणीत
राहणार असावं
शिव सकाळ
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात
शिव सकाळ
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं
शिव सकाळ
Good Morning Marathi Message
शुभ सकाळ
जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते
शुभ सकाळ
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी
तो धोकेबाज कधीच नसतो
शुभ सकाळ
नाते कितीही वाईट असले तरी
त्यांना कधी तोडायचा विचार करू नका
कारण मळलेल्या कपड्यांना
स्वच्छ पाण्याने धुतलं की ते निर्मळ होतात
शुभ सकाळ
एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो
शुभ सकाळ
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात
शुभ सकाळ
माणूस “कसा दिसतो” ह्यापेक्षा,
“कसा आहे” ह्याला महत्व असतं…
कारण शेवटी,
सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं
शुभ सकाळ
एकटे असल्याची खंत
मनात कधीच बाळगू नका
कारण थव्यामधील पक्षांपेक्षा
एकट्या गरुडाची झेप अधिक मोठी असते
शुभ सकाळ
हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे.
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा नाही मिळत
शुभ सकाळ
जसे आहात तसेच रहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल.
शुभ सकाळ
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही,
पण नसलं तर जेवणच जात नाही
ह्या पोस्ट मधील Marathi Good Morning Messages, Good Morning Quotes, Marathi Good Morning Status तुम्हाला आवडले आवडले असतील तर आपल्या मित्र परिवाराला सुद्धा नक्की पाठवा.