Gruhpravesh Ukhane : नवीन लग्न झाल्यावर किंवा नवीन घरात प्रवेश करताना आपल्याकडे उखाणे घेण्याची पद्धत आहे. नवऱ्याचं नाव चार ओळीत घेतले जाते त्याला उखाणे म्हणतात. पूर्वी पती ला नावाने हाक पाहण्याची पद्धत नव्हती म्हणून काही शुभकार्यात पतीचे नाव उखाण्यात घेतले जाते. नवीन लग्न झुलायवर दारात माप ओलांडून गृहप्रवेश करण्याची पद्धत आहे अशावेळी नव्या नवरीला उखाणे (Ukhane for Female) घेण्यासाठी अडवले जाते तसेच एखाद्या जोडप्याने नवीन घर घेतले असल्यात तिथे गृहप्रवेश च्या कार्यक्रमाच्यावेळी देखील उखाणा घेतला जातो. त्यासाठीच आम्ही नवीन गृह्प्रवेशासाठी उखाणे (Ukhane for Grihpravesh in Marathi) घेऊन आलो आहोत .
Grihpravesh Ukhane Marathi for New Home
दत्तगुरूंची आहेत तीन रूपे
ब्रम्हा, विष्णू आणि महेश
… रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश
सासरे आहेत प्रेमळ
सासू आहे हौशी
…. रावांचे नाव घेते
गृह्प्रवेशादिवशी
चांदीच्या ताटात
भरवला श्रीखंड पुरीचा घास, ….
रावांचे नाव घेते
गृहप्रवेशाच्या दिवशी खास…
उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल…
__च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल
लग्न झाले आता बहरू दे आमच्या संसाराची वेल,
… रावांचे नाव घेते वाजवून नव्या घराची बेल
श्रीमहालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी,
…. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी
आमच्या दोघांच्या जोडीला, आशिर्वाद तुमचा हवा,
….रावांसोबत आजपासून, संसार थाटेन नवा.
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज
…रावांचे नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
जमले सगळी नातीगोती आमच्या या नव्या घरात,
….रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात
त्यांचा छंद आहे क्रिकेट, आणि माझा खो-खो खेळ,
….रावांचे नाव घेते, कारण आहे गृह्प्रवेशाची वेळ.
… ची लेक मी झाली आता… ची सून,
…. रावांचे नाव घेते गृहप्रवेश करून
Also Read : Marathi Funny Ukhane
Gruhpravesh Ukhane for Bride | मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश
चांदीच्या दिव्यात लावली मी प्रेमरूपी वात,
… रावांचे नाव घेत करते सहजीवनाला सुरूवात
माहेरी साठवले, मायेचे मोती…
__च नाव घेऊन, जोडते नवी नाती
जमले आहेत सर्व आज, आमच्या लग्नाकरता दारात,
______ रावांचे नाव घेते, येऊ द्या आता घरात.
सह्याद्रीच्या कड्याकपारीत झाडी घनदाट,
…. रावांचे नाव घेते सोडा आता माझी वाट
आमच्या लग्नासाठी, छान केला सर्व थाट,
______ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
शुभ वेळी शुभ दिनी, आली आमची वरात…
__रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात
मराठीत आहेत खूप सुंदर सुंदर म्हणी,
…. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या क्षणी
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
…. रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट
मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा,
… रावांचे नाव घेत जपते मराठी परंपरा
दवबिंदूंनी चमकतो, फुलांचा रंग…
सुखी आहे संसारात, __ च्या संग
Best Gruhpravesh Ukhane in Marathi
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…
__रावांचे नाव घेते, __च्या दारात
कुलस्वामिनीला स्मरून करते वंदन तुम्हा सर्वांना,
…. रावांचे नाव घेत मागते आर्शीवाद द्या आम्हाला
लग्नाचे ७ फेरे आहेत, ७ जन्माच्या गाठी,
______ रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी.
नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले…
__रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले
माहेरच्या ओढीने, डोळे येतात भरून,
______ रावांच्या संसारात, मन घेते वळून.
जमले सर्व नातेवाईक, लग्न लागले दारात
,… रावांचे नाव घेते, मला आता येऊ द्या घरात
सुन मी _______ ची
पत्नी झाले _______ रावांची,
आता सुरू झाला संसार
कमी नाही सुखाची
नवे घर, नवी नाती
संसार होईल मस्त
—- राव असता सोबती
…. च्या घरी कधी जाणार याची लागली होती चाहुल,
…. रावांचे नाव घेते टाकत नव्या घरी पाऊल
Marathi Ukhane for Female Gruhpravesh
हंड्यावर ठेवले हंडे, त्यावर ठेवली परात,
…. रावांचे नाव घेते करत प्रवेश नव्या घरात
आरतीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा
… रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा
गुलाबी शालूला जरीचा काठ
… रावांचे नाव घेता सोडा माझी वाट
रुखवतीत ठेवले होते खोबऱ्याचे काप,
…. रावांचे नाव घेते ओलांडून नव्या घराचे माप
द्वारकेत कृष्ण, अयोध्येत राम,
…. रावांचे चरण, हेच माझे चारही धाम.
कोकणात जाताना, लागते जंगल घनदाट,
…..रावांसोबत बांधली, अखेर जीवनगाठ
सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान
…. च्या जीवावर मी आहे भाग्यवान
कृष्ण वाजवतो, गोकुळात बासरी,
…..रावांसोबत आली, मी सासरी
नव्या दिशा नव्या आशांसह करते नव्या घरी पदार्पण,
…. रावांसाठी करेन संपूर्ण जीवन अर्पण
New Gruhpravesh Ukhane in Marathi
धान्याचे माप काठोकाठ भरले,
…. रावांचे नाव घेत सौभाग्यवती झाले
लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी
….रावांच्या घराची झाले मी गृहणी
मराठी भाषा आहे, महाराष्ट्राची अस्मिता,
_______ राव माझे श्रीराम, आणि मी त्यांची सीता.
विवाह म्हणजे सुरूवात नव्या जीवनाची,
… रावांचे नाव घेते जाणीव ठेवत कर्तव्यांची
झाला संध्या समय घरट्यात परतती पक्षांचे थवे
….रावांच्या नावाने मिळाले जीवन नवे
लग्नामुळे दोन घर जुळतात, सासर आणि माहेर,
आपण सर्व आज उपस्तीथ राहिले, हाच आहे आमचा आहेर.
उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते,
… रावाच्या जीवनात भाग्याने प्रवेश करते…
लग्नात महत्वाचे, फेरे असतात सात,
…आणि…..वर नेहमी असुद्या, आशीर्वादाचा हात.
सोन्याच्या साखळीत ओवळे काळे मणी
…. राव झाले माझे सौभाग्याचे धनी
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi | Inspirational Quotes In Marathi | Attitude Status In Marathi
Ukhane
Funny Ukhane In Marathi | Ukhane Marathi For Female | Marathi Ukhane For Male