Gudi Padwa Wishes in Marathi : हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि साडे तीन मुहूर्तापैकी एक दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात तसेच अनेक राज्यात हा सण मोठया उत्सहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मराठी संस्कृती जपणारे कार्यक्रम राबवले जातात. घराघरात गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. ह्या मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवण्यासाठी आम्ही गुढीपाडव्यासाठी संदेश घेऊन आलो आहोत
Latest Gudi Padwa Messages, Wishes in Marathi
चंदनाच्या काठीवर,
शोभे चांदीचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
पडता दारी पाऊल गुढीचे आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे,….
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला
चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी
लोटा चांदीचा, माळ सुगंधी
उभारतो मराठी मनाची गुढी
साधू संतांची पुण्याई
नांदो सुख समृद्धी दारी
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
चैत्राची नवी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी,
चैतन्य आहे आज सर्वदारी….
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आला आहे सुखसमृद्धीचा
क्षण आला आहे नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आहे
आजचा दिवस खास
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा
आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.
हिंदू नववर्षाची सुरूवात..कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..
चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर..
आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा
जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा
वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार..
हिरवळीने सुंगधित झाली आहे निसर्ग अपरंपार..
चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi | Inspirational Quotes In Marathi | Attitude Status In Marathi
Ukhane
Funny Ukhane In Marathi | Ukhane Marathi For Female | Marathi Ukhane For Male