Holi Wishes in Marathi : होळी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही ओळखले जाते. होळी हा सण गोडपणा, आपुलकी, राग, आनंद अशा जीवनातील रंगांचा सण आहे. होळीच्या दिवशी एकमेकांबद्दलचा राग, मत्सर, द्वेष तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते. आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा सण साजरा केला जातो .
अशा ह्या होळीच्या सणाला अमूल्य नातेवाईक, मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी शुभेच्छा (Happy Holi Wishes in Marathi) आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्ही WhatsApp द्वारा (Holi Marathi Status for WhatsApp) सुद्धा पाठवू शकता.
Happy Holi Wishes in Marathi
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वालेत वाईटाचा
समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाला
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी संगे केर कचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Holi Messages in Marathi
आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of फन
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
उत्सव रंगांचा
पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम, आनंद, सौहार्द आणि विश्वासाच्या रंगांमधल्या
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ
तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा,
रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
आली होळी, आली होळी,नवरंगांची घेऊन खेळी
तारुण्याची अफाट उसळी, रंगी रंगू सर्वांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Holi Quotes in Marathi
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
होळीच्या रंगीत शुभेच्छा
होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
होळीच्या रंगीत शुभेच्छा
प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली
होळीच्या रंगीत शुभेच्छा
तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ
होळीच्या रंगीत शुभेच्छा
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
होळीच्या रंगीत शुभेच्छा
होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
होळीच्या रंगीत शुभेच्छा
थंड रंगस्पर्श,मनी नवहर्ष
अखंड रंगबंध ,जगी सर्वधुंद…
होळीच्या रंगीत शुभेच्छा
भेटीलागी आले।
रंगांचे सोयरे।
म्हणती काय रे।
रंग तुझा।।
वदलो बा माझी ।
पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात।
मिसळतो।।
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय.
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
तुम्हाला होळीच्या शुभेच्छा
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाळां,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला
क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण रंग गुलाल उधळू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi | Inspirational Quotes In Marathi | Attitude Status In Marathi
Ukhane
Funny Ukhane In Marathi | Ukhane Marathi For Female | Marathi Ukhane For Male