12 Jyotirlinga in Marathi – भगवान शंकराला देवांचा देव असं संबोधित केले जाते. सर्वात लवकर प्रसन्न होणारे भगवान म्हणजे शिव शंकर. हिंदू धर्मातील पुराणानुसार भगवान शिव जिथे जिथे स्वतः प्रकट झाले त्या स्थानांवर ही ज्योतिर्लिंग स्थापण्यात आली आहेत. हि भगवान शंकराची ज्योतिर्लिंग कोणती आहेत? कुठे आहेत? अश्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या लेखात नक्की मिळतील.
12 Jyotirlinga Name List in Marathi
क्रमांक | नाव (Jyotirlinga Name in Marathi) | राज्य | ठिकाण |
1 | सोमनाथ ज्योतिर्लिंग (Somnath Jyotirlinga) | गुजरात | वेरावळ |
2 | मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (Mallikarjun Jyotirlinga) | आंध्रप्रदेश | श्रीशैलम |
3 | महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (Mahakaleshwar Jyotirlinga) | मध्यप्रदेश | उज्जैन |
4 | ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (Omkareshwar Jyotirlinga) | मध्यप्रदेश | खंडवा |
5 | केदारनाथ ज्योतिर्लिंग (Kedarnath Jyotirlinga) | उत्तराखंड | केदारनाथ |
6 | भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bheemashankar Jyotirlinga) | महाराष्ट्र | भीमाशंकर |
7 | काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग (Kashi Vishwnath Jyotirlinga) | उत्तरप्रदेश | वाराणसी |
8 | त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbkeshwar Jyotirlinga) | महाराष्ट्र | नाशिक |
9 | वैद्यनाथ/वैजनाथ ज्योतिर्लिंग (Baidynath Jyotirlinga) | झारखंड | दुमका |
10 | नागेश्वर ज्योतिर्लिंग (Nageshwar Jyotirlinga) | गुजरात | द्वारका |
11 | रामेश्वर ज्योतिर्लिंग (Rameshwar Jyotirlinga) | तामिळनाडू | रामनाथपुरम |
12 | घृणेश्वर ज्योतिर्लिंग (Grishneshwar Jyotirlinga) | महाराष्ट्र | औरंगाबाद |
१. श्री क्षेत्र सोमनाथ ज्योतिर्लिंग
गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये वेरावळच्या समुद्रकिनाऱ्या जवळ सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे. अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर असणारे सोमनाथाचे मंदिर अत्यंत आकर्षक आहे. प्राचीन हिंदू ग्रंथांनुसार सोम अर्थात चंद्राने दक्ष राजाच्या 27 कन्यांसह विवाह केला. पण रोहिणीवरील त्याच्या जास्ती प्रेमामुळे इतरांवर अन्याय होत असल्याचे पाहून राजा दक्षाने त्याला शाप दिला होता . पण चंद्राने शिवशंकाराची भक्ती करून या शापातून स्वतःला मुक्त करून घेतले आणि म्हणूनच या मंदिराचे नाव सोमनाथ असे पडले अशी आख्यायिका आहे.सोमनाथाजवळ पाच पांडवाचे वास्तव्य होते असाही इतिहास आहे.ह्या मंदिराचा ऋग्वेदामध्ये उल्लेख असल्याने हे शिवशंकराचे अत्यंत पवित्र मंदिर मानण्यात येते.
२. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
भारताच्या आंध्रप्रदेश राज्यातील श्रीशैलम या ठिकाणी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग स्तिथ आहे. दक्षिणेचा कैलाश या नावानेदेखील हे स्थळ ओळखण्यात येते. शिवपार्वती पुत्र गणेश हे आपला मोठा भाऊ कार्तिकेयाच्या आधी लग्न करू इच्छित होते. मात्र त्यानंतर जो पृथ्वीची प्रदक्षिणा पहिले करून येईल त्याचे लग्न प्रथम करून देण्यात येईल अशी युक्ती शिवपार्वतीने केली. यानंतर कार्तिकेय आपले वाहन मोरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालू लागला. मात्र गणपती बाप्पाने माता पार्वती आणि भगवान शिव यांना प्रदक्षिणा घालत तेच आपल्यासाठी पृथ्वी असल्याचे सांगितले. ही हार कार्तिकेयला सहन झाली नाही आणि त्यानंतर तो पळून गेला. त्याला समजावण्यासाठी पार्वती गेली असता तिथून कार्तिकेय निघून गेले. पार्वती म्हणजेच मल्लिका हताश झाली आणि तिथेच शिवशंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले तेच स्थान म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर.
३. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग
मध्यप्रदेशातील उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध आहे. येथील मूर्ती दक्षिणमुखी असल्याने त्याला दक्षिण मूर्ती असे हि वळले जाते. पुराणानुसार एकदा ब्रम्हा, विष्णू आणइ महेश यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना शिवाच्या मनात विष्णू आणि ब्रम्हदेवाची परीक्षा घ्यावी असे आले. त्यांनी दोघांनाही प्रकाशाचा अंत कुठे आहे हे शोधण्यास सांगितले.दोघांनीही शोध घेतला पण अखेर थकून विष्णूने हार मानली तर ब्रम्हदेवाने टोक सापडले असे खोटे सांगितले.खोटेपणामुळे शिवशंकरानी महाकाल रूप धारण केले म्हणून त्याला महाकालेश्वर असे संबोधले जाते.
४. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग
उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून केवळ दोन ते तीन तासाच्या अंतरावर नर्मदा नदीच्या काठावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे.
राजा माधांताने नर्मदेच्या किनारी असणाऱ्या या पर्वतावर घोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि भगवान शिवाने इथे राहावे असा वर मागितला. त्यामुळेच या ठिकाणाला ओंकार मधांता असेही नाव प्राप्त झाले. ह्या मंदिराचा भाग ओंकाराचा आकाराचा आहे म्हणून त्याला ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाते.
५. केदारनाथ ज्योतिर्लिंग
भारताच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये हिमालय पर्वताच्या गडवाल रांगांमध्ये असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्यामध्ये केदारनाथ ज्योतिर्लिंग वसलेले आहे. केदारनाथाचे दर्शन ज्या व्यक्ती घेतात त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात असा समज आहे. भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर म्हणून केदारनाथ मंदिराला प्रचिती आहे.
६. भीमाशंकर ज्योतिर्लिंग
भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी स्थित असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते.
कुंभकर्णाच्या पत्नीने कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर मुलगा भीमाला देवदेवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर देवांचा बदला घ्यायचे ठरवले आणि ब्रम्हदेवाची कठोर तपस्या केली. त्याच्याकडून सर्वात बलशाली होण्याचे वरदान घेतले. एकदा असेच जात असताना राजा कामरूपेश्वराला महादेवाची भक्ती करताना पाहून त्याला आपली भक्ती करण्यास भीमाने सांगितले. मात्र राजाने नकार दिल्यावर त्याने त्याला बंदिस्त केले. कारागृहात राजाने शिवलिंग तयार करून पूजा करायला सुरूवात केली. भीमाने रागाने हे तलवारीने तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून महादेव प्रकट झाले. त्यानंतर शिव आणि भीममध्ये युद्ध झाले आणि त्यात भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर महादेवांना तिथेच वास्तव्य करण्याची राजाने विनंती केली. भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे
७. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग
काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भारताच्या उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी या ठिकाणी आहे. कैलासावर भस्म फासून राहणाऱ्या भगवान शंकराची सगळेच टिंगल करत होते. त्यामुळे पार्वतीने मला कोणाही चिडवणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली. म्हूणन वाराणसीच्या ठिकाणी शंकर येऊन राहू लागले अशी आख्यायिका सांगितली जाते.
८. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक या ठिकाणी ,गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे शिवलिंग आपल्याला डोळ्यांच्या आकाराचे आहेत आणि त्यामध्ये तीन छोटे छोटे लिंग दिसतात त्या लिंगांना ब्रम्हा,विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते. त्र्यंबक ऋषींमुळेच या मंदिराला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले
९. वैद्यनाथ/वैजनाथ ज्योतिर्लिंग
वैद्यनाथ/वैजनाथ ज्योतिर्लिंग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परळी या ठिकाणी स्थित आहे. वैद्यनाथ येथे देवाच्या पायाला अर्थात देवाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन घेता येते.रावण भगवान शिवशंकाराला शिवलिंगाच्या रूपात स्थापित करण्यासाठी नेत असताना मार्गात परळीतील मेरूपर्वतावर शिवलिंग ठेवल्यामुळे भगवान शिव स्वयंभू शिवलिंग रूपात तिथेच स्थापित झाले असे म्हंटले जाते.
१०. नागेश्वर ज्योतिर्लिंग
नागेश्वर ज्योतिर्लिंग हे द्वारका शहर आणि बायत द्वारका बेटाच्या वाटेवर गुजरातमधील सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर स्थित आहे. इथे भगवान शंकराची 25 मीटर उंच बसलेली मूर्ती पाहायला मिळते.नागेश्वर ज्योतिर्लिंगाला ‘दारुकवण’ असेही संबोधले जाते.भक्तांचा असा विश्वास आहे की, या ठिकाणी भगवान शंकराची प्रार्थना केल्यावर ते विषापासून म्हणजे नकारात्मक गोष्टींपासून (पापापासून) मुक्त होतात.
\सुप्रिय नावाचा एक वैश्य महादेवाचा भक्त होता. तो नेहमी महादेवाच्या भक्तीमध्ये लीन होता. एकदा सुप्रिय नावेत बसून एका ठिकाणी जात असताना अचानक दारूक नावाच्या राक्षसाने त्या नावेतील सर्व लोकांना बंदी बनवले. कारागृहातही सुप्रिय महादेवाची भक्ती करण्यात लीन होता. दारूकाला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने सुप्रियला महादेवाची भक्ती न करण्यास सांगितले. परंतु सुप्रियने त्याचे काहीही एकले नाही. त्यानंतर क्रोधीत दारुकाने आपल्या सेवकांना सुप्रियचा वध करण्यास सांगितले. राक्षसांच्या सेवकांना पाहून सुप्रिय त्यांना न घाबरता महादेवाच्या भक्तीमध्ये लीन राहिला. सेवक कारागृहात पोहोचताच तेथे एका उंच ठिकाणी स्वतः महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सुप्रियला पाशुपतास्त्र दिले. सुप्रियने त्या अस्त्राने दारूका राक्षस आणि त्यांच्या सर्व सेवकांचा वध केला. मृत्युपूर्वी दारूक मुक्तीसाठी महादेव आणि पार्वतीकडे प्रार्थना करू लागला. त्याची प्रार्थना मान्य करून महादेवाने त्याला मुक्ती दिली आणि हे ठिकाणही त्याच्या नावाने प्रसिद्ध होईल असे वरदान दिले. सुप्रियने महादेवाकडे येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर महादेव येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग रुपात स्थित झाले, अशी आख्यायिका आहे
११. रामेश्वर ज्योतिर्लिंग
रामेश्वर ज्योतिर्लिंग हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम या ठिकाणी आहे. स्वतः रामाने शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आहे असे सांगण्यात येते. म्हणून ह्या ज्योतिर्लिंगाला रामेश्वर म्हणून ओळखले जातात.
१२. घृणेश्वर ज्योतिर्लिंग
घृणेश्वर ज्योतिर्लिंग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद या ठिकाणी वेरूळ लेण्यांजवळ स्थित आहे. या मंदिराचे बांधकाम हे लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. हिंदू धर्माच्या आख्यायिकेनुसार घृष्णा आणि सुदेहा अशा दोन बहिणी होत्या आणि या बहिणी सख्ख्या सवतीही होत्या. दोघींचा एकाच माणसाशी विवाह झाला होता. पण दोघींनाही मूलबाळ नव्हते. घृष्णा शिवभक्त होती आणि शंकराची नित्यनेमाने पूजा व उपासना करत होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिला पुत्रप्राप्ती झाली. पण तिच्या बहिणीने सवती मत्सराने या मुलाला ठार मारले आणि नदीत फेकले. ही घटना घडली तेव्हा घृष्णा शिवपूजा करत होती. आपल्या मुलाला मारले जात आहे हे ऐकूनही ती विचलित झाली नाही आणि तिने पूजा तशीच चालू ठेवली. ज्याने मला पुत्र दिला आहे, तोच त्याचे रक्षण करेल असे म्हणत ती पूजा करत राहिली. तिची भक्ती पाहून शंकर भगवान प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. घृष्णेच्या नावामुळेच या स्थानाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले.
अशा प्रकारे १२ ज्योतिर्लिंग भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहेत. अधिक माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi | Inspirational Quotes In Marathi | Attitude Status In Marathi
Ukhane
Funny Ukhane In Marathi | Ukhane Marathi For Female | Marathi Ukhane For Male