किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा याला वैद्यकीय भाषेत रेनल कॅल्क्युली, युरोलिथियासिस किंवा नेफ्रोलिथियासिस असेही म्हणतात. मानवी शरीराच्या लघवी मध्ये अनेक विरघळलेली खनिजे आणि क्षार असतात आणि जेव्हा या क्षार आणि खनिजांची पातळी वाढते तेव्हा मूत्रपिंडात दगड म्हणजेच किडनी स्टोन होण्याची प्रक्रिया सुरु होते. योग्यवेळी योग्य उपचार न घेतल्यास त्यांचा आकार वाढत जातो आणि जास्ती त्रास सहन करावा लागतो.
जेव्हा हे स्टोन किडनीमध्ये असतात तेव्हा त्याचा त्रास खूप कमी प्रमाणात होत असतो परंतु हेच किडनी स्टोन मूत्रपिंड किंवा मूत्रनलिकेमध्ये अडकले तर ते लघवीचा प्रवाह रोखू शकतात त्यामुळे जास्ती वेदनाना सामोरे जावे लागते.
म्हणून मुतखडा कशामुळे होतो? किंवा झाल्यास कोणते उपचार घ्यावेत आणि ते पुन्हा होऊ नयेत ह्यासाठी कोणती काळजी घ्यावी ह्याची माहिती असणे गरजेचे आहे.
आजच्या या लेखात आम्ही काही मुतखडा लक्षणे आणि उपाय सांगितलेले आहेत, तुम्ही हा लेख काळजी पूर्वक वाचावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
मुतखडा लक्षणे किंवा किडनी स्टोनची लक्षणे | Kidney Stone Symptoms In मराठी
तीव्र वेदना हे मुतखड्याचे मुख्य लक्षण असले तरी त्यासोबत इतर हि लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे.
मुतखडा लक्षणे खालिलप्रमाणे –
१ . लघवी करताना वेदना होणे हे मुतखडा लक्षण आहे
सामान्यतः लघवी करताना वेदना होत नाहीत, परंतुमूलघवी करताना वेदना होऊ लागल्या तर असं का होत आहे ह्याचे निदान करणे गरजेचे आहे. लघवीमार्गात कसलातरी अडथळा आल्याने लघवी करताना वेदना होतात आणि हा अडथळा वर सांगितल्या प्रमाणे त्या दगडाचा म्हणजेच मुतखड्याचा असू शकतो, म्हणून लघवी करताना वेदना होणे हे मुतखडा होण्याचे लक्षण असू शकते. वेदना जास्त होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
२ . लघवी झाल्यासारखे वाटणे किंवा खूप कमी लघवी होणे मुतखडा होण्याचे लक्षण आहे
खूप कमी लघवी होणे किंवा झाल्यासारखे वाटणे हे देखील मुतखड्याचे लक्षण असू शकते. मूत्रपिंडात असलेले खडे मूत्रमार्गातून जातात आणि हे दगड मूत्राशय अवरोधित करतात, ज्यामुळे लघवीचा स्त्राव कमी होऊ शकतो.
३ . लघवी करताना रक्त येणे हे मुतखडा लक्षण आहे
मुतखडा लघवीचा मार्ग अडवतो आणि जेव्हा मूत्राशयात आकुंचन होते तेव्हा त्यातून रक्त येऊ लागते आणि ते लघवीने बाहेर येते. म्हणून हे मुतखडा झाल्याचे लक्षण असू शकते. असे लक्षण आढळ्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
४ . पाठीचा कणा, ओटीपोटात वेदना आणि पेटके येणे सुद्धा मुतखडा लक्षण असू शकते
लघवीमार्गात मुतखड्यामुळे जेव्हा अडथळा निर्माण होतो तेव्हा तीव्र वेदना होतात आणि पाठीचा कणा, ओटीपोटात वेदना आणि पेटके यायला सुरवात होतात म्हणून हे सुद्धा मुख्य लक्षण असू शकते.
५ . मळमळ आणि उलटी होणे मुतखड्याचे लक्षण असू शकते
किडनी स्टोन म्हणजेच मुतखडे जेव्हा किडनी ब्लॉक करतात तेव्हा काही अंशी पचनसंस्थेला नुकसान पोचते त्यामुळे मळमळ उलटी ह्यसारखी लक्षण दिसून येऊ शकतात.
६. लघवीचा रंग गडद होणे मुतखडा लक्षण असू शकते
जेव्हा लघवीचा रंग रक्तासारखा दिसू लागतो तेव्हा किडनी स्टोन म्हणजे मुतखडा असण्याची जास्ती शक्यता असते. जर तुमच्या लघवीचा रंग लालसर रक्तासारखा दिसू लागला तर डॉक्टरांच्या सल्य्याने उपाय करावेत.
७. ताप किंवा घाम येणे इ. हे सुद्धा मुतखडा होण्याचे लक्षण आहे
किडनी स्टोनवर उपचार न केल्यास,मूत्रमार्गात संसर्ग होऊन खूप ताप आणि थंडी वाजून येणे ही समस्या येऊ शकते त्यामुळे डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली त्वरित उपचार घेणे गरजेचे आहे.
मुतखडा घरगुती उपाय मराठीत | Home Remedies For Kidney स्टोन
कमी पाणी प्यायल्याने खनिजे मूत्रपिंडात दीर्घ काळासाठी जमा होऊन मुतखडा होऊ शकतो. म्हणून भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करणे हा किडनी स्टोन साठी मुख्य उपाय आहे.
१. तुळशीचा रस
तुळशी च्या पानांमधील ऍसिडिटी ऍसिड मुतखडा तोडण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते म्हणून तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन करू शकता.
२. सफरचंद व्हिनेगर
सफरचंदाच्या व्हिनेगरमधील सायट्रिक अॅसिड स्टोनचे लहान तुकडे करण्याचे काम करते. दोन चमचे व्हिनेगर कोमट पाण्यासोबत घेतल्याने मुतखड्याच्या समस्येत आराम मिळतो.
३. डाळिंबाचा रस –
डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि किडनी स्टोनमध्ये खूप आराम मिळतो.
४. गव्हाच्या पातीचे ज्यूस
गव्हाच्या पातीच्या ज्यूसमधील अँटिऑक्सिडंट्समुळे मुतखडा विरघळण्यास मदत होते. त्यामुळे त्याचे सेवन सुद्धा तुम्ही करू शकता
५. कडुलिंब
कडुलिंबाची पाने जाळून त्याचे भस्म रोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा पाण्यासोबत घेतल्याने आराम मिळतो.
मुतखडा झाल्यास कोणती काळजी घ्याल
किडनी स्टोन झाल्यास, स्टोनवर डॉक्टरांच्या सल्याने लवकर उपचार करावेत. किडनी स्टोन टाळण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत काही बदल केले पाहिजेत. जसे-
- सोडियम जास्त प्रमाणात घेऊ नये .
- जंक फूड, कॅन केलेला अन्न आणि मिठाचे अतिसेवन टाळा.
- पालक, संपूर्ण धान्य इत्यादींमध्ये ऑक्सलेट पुरेशा प्रमाणात आढळते. त्याचे सेवन करू नये
- टोमॅटो बियाणे, वांग्याचे दाणे, कच्चा तांदूळ, उडीद, हरभरा यांमुळे किडनी स्टोनचा त्रास होण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे ते पदार्थ खाणे टाळावे
- जास्त पाणी प्यावे.
किडनी स्टोन किंवा मुतखडा म्हणजे खनिजे आणि क्षार यांचा बनलेला साठा किंवा दगड, ह्याचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो ज्यामुळे मूत्रप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. म्हणून मुतखड्याचे लक्षण आणि उपाय जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हा लेख जरूर वाचा आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला जरूर शेअर करा