जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध कविता “कणा” मराठी विश्व् वर घेऊन आलो आहोत. कवी कुसुमाग्रज यांनी खूपच छान पद्धतीने आपल्या लेखीनीच्या मदतीने पावसाच्या भयानक रुपाला बळी पडलेल्या व्यक्तीच्या मनाचा आदर करत, सगळ्या लोकांसमोर मांडलेली कविता आहे.
कणा कविता by Kusumagraj
ओळखलत का सर् मला? पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसावरति पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणी, आली गेली घरटयात राहुन.
माहेरवाशिण पोरीसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको माञ वाचली.
भिंत खचली चूल वीझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले.
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बान्धतो आहे, चिखल गाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, नुसते लढ म्हणा!
Trending Quotes
Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi
Trending Festive Blogs
Valentine Day Wishes in Marathi | Shiv Jayanti Wishes in Marathi