40+ Love Quotes In Marathi | मराठीतील सर्वोत्कृष्ट लव्ह कोट्सची यादी

You are currently viewing 40+ Love Quotes In Marathi | मराठीतील सर्वोत्कृष्ट लव्ह कोट्सची यादी

तुम्हीसुद्धा कोणावर प्रेम करता पण ते समोरच्याला कास सांगायचं ह्याचा विचार करताय तर हे लव्ह quotes (Love Quotes/ Status in Marathi)  तुमच्यासाठी , जे तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करायला नक्की मदत करतील. 

प्रेम म्हणजे काय? ह्याच उत्तर देणं खरतर खूप कठीण आहे. प्रेम हि एक अशी गोष्ट आहे जी शब्दात मांडणं खूपच कठीण आहे. प्रेम एक भावना आहे जी प्रत्येक जण  आयुष्यात कधीतरी अनुभवत असतोच. परंतु हे प्रेम व्यक्त कारण गरजेचं असते. जी व्यक्ती आपल्याला आवडते , आपण जिच्यावर प्रेम करतो हे त्या व्यक्तीपर्यन्त पोचवणं गरजेचं असते जी व्यक्ती आपल्याला आवडते , आपण जिच्यावर प्रेम करतो हे त्या व्यक्तीपर्यन्त पोचवणं गरजेचं असते मग ती व्यक्ती तुमची पत्नी (Love Quotes for Wife) , पती (Love quotes for Husband) किंवा प्रियसी असू शकते त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मराठी लव्ह quotes (Love Quotes in marathi) आणि मराठी लव्ह स्टेटस (Love Status Marathi)  जे तुम्ही तुमच्या WhatsApp, Facebook स्टेटस (Status) ला ठेवू शकता आणि आपल्या भावना व्यक्त करू शकता.

प्रेम व्यक्त करण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत कोणी कवितेतून कोणी शायरी मधून तर कोणी एखाद पत्र लिहून सुद्धा आपल्या भावना व्यक्त करू शकतो. सध्या मोबाईल च्या युगात आपण ह्या भावना स्टेटस , quotes द्वारया हि पोचवू शकतो कारण प्रेम यक्त होणे महत्वाचे असते माध्यम कुठले हि असो. त्यामुळे आमच्या ह्या पोस्ट चा तुम्हाला नक्की फायदा होईल. 

लव्ह कोट्स इन मराठी | Love Quotes in Marathi

जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणावरही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

जीवनाच्या वाटेवर चालताना

मी जागें अथवा मरेन

पण आयुष्याच्या शेवटपर्यंत

तुझ्यावरच प्रेम करेन

मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतांनाही,

मला तुझं असणं हवं आहे……

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे

तुझ्यासारख दुसर कोणीही नाही.

लव्ह स्टेटस इन मराठी  | Love Status in Marathi

लव्ह स्टेटस इन मराठी  | Love Status in Marathi

आयुष्यभर साथ द्याची कि नाही

हा तुझा निर्णय आहे

पण मरेपर्यंत तुझी साथ देईन

हा शब्द माझा आहे ….

वाळू वर कोरलेलं नाव  

एकाक्षणात जाईल..

पण

हृदयात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.

आयुष्य थोडाच असावं

पण

जनोमोजन्मी तुझंच प्रेम मिळावं

एवढं प्रेम तर कधी स्वतः वर पण

नाही झालं..

जेवढं तुझ्यावर झाल आहे…

प्रेम काय  असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

Marathi Love Quotes

Marathi Love Quotes

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो…

अनोळखी माणसाना हृदयात स्थान देतो…

ज्यांना कधी ओळखत हि नसतो…

त्यांना पार जिवलग बनवतो..!

मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि 

जगण्यासाठी फक्त एकच कारण आहे ते म्हणजे “तू”

प्रेमात जीव द्यायचा नसतो,

प्रेमात जीव घ्यायचा नसतो,

प्रेमात तर फक्त 

जीव लावायचा असतो.

तू माझ्या आयुष्यातील ते सुख आहेस…

जे मी इतरांबरोबर

कधीच Share नाही करु शकत…

आयुष्यात ऐक वेळ अशी येते 

जेव्हा प्रश्न नको असतात 

हवी असते ती फक्त साथ

Marathi Love Quotes Messages

Marathi Love Quotes Messages

मी तुझं पाहिलं प्रेम आहे कि नाही माहित नाही

पण मला तुज शेवटचं प्रेम होयच…

मला फक्त तुझी साथ हवी,

माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,

केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर

निभवण्याची तुझी जिद्द हवी

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

प्रेम केलं ज्याच्यावर

त्याच्याशीच लग्न करणार..

नाही म्हंटले तर त्याला

मंडपातून पळवून आणणार

मान अपमान प्रेमात काहीच नसतं,

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

Marathi Love Status & Messages 

Marathi Love Status & Messages 

आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय
प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचंय,
हातामध्ये हात घेऊन तुझा
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय..

एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण,एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं

दुसऱ्यांवर प्रेम करतो

त्यापेक्षा जास्त प्रेम स्वतःवर करावं

जगताना कधी कधी 

स्वार्थी होऊन बघावं

प्रेम वस्तू नाही

मिळवण्याची

एक भावना आहे समजून घेण्याची 

आणि स्वतः अनुभवण्याची

प्रेम व्यक्त करायला 

धाडस लागते आणि 

समोरच्याला ते समजायला 

नशीब लागते

Romantic Love Quotes in Marathi 

Romantic Love Quotes in Marathi 

ओढ म्हणजे काय ते,

जीव लागल्याशिवाय समजत नाही.

विरह म्हणजे काय ते,

प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.

प्रेम म्हणजे काय ते,

स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

रोज रोज त्रास होतो

तुझ्यापासून दूर राहण्याचा.

कधी खेळ हा थांबेल

संदेशाद्वारे बोलण्याचा.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते

नातं हे प्रेमाच..नुसत्या नजरेनेच जुळतं..

सगळ काही मनातल मग न बोलताच समजतं.

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.

Marathi Prem Status

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे 

कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,

ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,

कारण प्रेम हे मौल्यवान असते.

कविता चुकली तर कागद फडता येतो

पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.

प्रेम हे तेव्हाच टिकते

जेव्हा ते दोघांनाही हवे असते

प्रेमाचे कोट्स मराठी

क्षितिजा सारखं फसवं प्रेम करू नकोस

उंच उडायचं स्वप्न दाखवून

एकटं मात्र सोडू नकोस

लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल 

खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेईल

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,

कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,

आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,

त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

प्रेम त्याच्यावर करावे,

ज्याला आपण आवडतो,

नाहीतर आपल्या आवडीसाठी,

आपण उगाच आयुष्य घालवतो

आयुष्य हे एकदाच असते,

त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,

आपण दुसऱ्याला आवडतो,

त्यालाच प्रेम समजायचे असते.

Heart Touching Love Quotes in Marathi

तुला पाहिलं त्याक्षणापासून,

रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.

तुझ्याच साठी जगता जगता,

माझे जगणे मात्र विसरून गेलो.

प्रेम म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी जीवनाची वाट.

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,

सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,

तुझी ती प्रेमळ नजर,

माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,

आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे 

जी दुर्बल व्यक्तीला मजबूत 

आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे 

ते दिसत नाही 

पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते

संबंधित ब्लॉग

Love quotes for wife – मराठी लव्ह कोट्स फॉर वाईफ.

Nature Quotes In Marathi – निसर्ग कोट्स व सुविचार

Leave a Reply