मराठी भाषा दिन : संपूर्ण माहिती आणि कविता (Marathi Bhasha Gaurav Din)

You are currently viewing मराठी भाषा दिन : संपूर्ण माहिती आणि कविता (Marathi Bhasha Gaurav Din)

Marathi Bhasha Gaurav Din: २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिन साजरा केला जातो. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे हाच मुख्य हेतू आहे.

कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात तसेच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आले आहे. 

मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे.मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण-दीव या  प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे तिथे हि मराठी भाषा बोलली जाते.

या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते तसेच विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात. 

आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगायला हवा आणि  मराठी भाषा समृध्द करण्यासाठी, जोपसण्यासाठी प्रयत्न करायाला हवेत 

Marathi Bhasha Din कविता 

Marathi Bhasha Din कविता 

मराठी भाषा दिन कविता  – १ (Marathi Bhasha Din)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म पंथ जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमच्या मनामनात दंगते मराठी

आमच्या रगा रगात रंगते मराठी

आमच्या उरा उरात स्पंदते मराठी

आमच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी : सुरेश भट

मराठी भाषा दिन कविता  -२ (Marathi Bhasha Din)

एक सूर एक ध्यास छेडितो मराठी

एक संघ एक बंध गुंजीतो मराठी,

एक श्वेत अनेक रंग रंगतो मराठी

एक बोध एक विचार मांडतो मराठी,

एक साज एक आवाज ऐकतो मराठी

एक मन एक क्षण जगतो मराठी,

माय मराठी, साद मराठी

भाषांचा भावार्थ मराठी

चाल मराठी, बोल मराठी

जगण्याला या अर्थ मराठी

सांगतो मराठी…… वाहतो मराठी

पूजितो मराठी….. साहतो मराठी

हुकरते मराठी…. गर्जते मराठी

Trending Quotes

Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi

Trending Festive Blogs
Valentine Day Wishes in Marathi | Shiv Jayanti Wishes in Marathi

Leave a Reply