100 मराठी म्हणी व अर्थ | Marathi Mhani

You are currently viewing 100 मराठी म्हणी व अर्थ |  Marathi Mhani

मराठी म्हणी: ह्या पोस्ट मध्ये आम्ही शालेयकिंवा स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त list of मराठी म्हणी व त्याचे अर्थ  दिले आहेत . खाली दिलेल्या यादीत काही famous marathi mhani आहेत ज्या विद्यार्थीसाठी महत्त्वाच्या आहेत आणि ह्या marathi mhani परीक्षांमध्ये नेहमी विचाल्या जातात.

म्हणी म्हणजे काय ?

परंपरेने आलेल्या अनुभवावरून कमीत कमी शब्दात सध्य परिस्थितीवर वापरला जाणारा सूचक शब्दसमूह म्हणजे म्हणी होय. ह्या म्हणी मुळे मराठी भाषेचे सौदंर्य अजून खुलून येते.

मराठी म्हणी व अर्थ | Mhani in Marathi with मेअनिंग (म्हणी व त्याचे अर्थ 100)

१. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अतिशहाणपना करणारा मनुष्य वारंवार फसतो.

२. अति राग भीक माग – कोणीही अतिराग करू नये, त्याने मनुष्य भिकेला लागतो.

३. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऐपतीच्या मानाने खर्च करावा. अति खर्च करू नये

४. असतील शिते तर जमतील भूते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल  तरच त्याच्याभोवती माणसे गोळा होतात

५.अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमी वाईट असतो.

६.आयत्या बिळावर नागोबा – एखाद्याने स्वतः साठी केलेल्या गोष्टीचा फायदा स्वतःसाठी करण्याचा स्वभाव असणे

७.आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पहावी; नंतर देवधर्म करने

८. अडला हरी गाढवाचे पाय धरी – बुधिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

९. अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते

१०. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – वाईट माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो

११. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

१२. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- स्वतःजवळ नसेल  तो दुसऱ्यास कुठून देणार ?

१३. चोराच्या मनात चांदणे – वाईट कृत्य करणाऱ्याला ते सर्वांसमोर उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.

१४. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – जो आपल्यावर उपकार करतो त्याचे नेहमी गुणगान गावे

१५. टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही – कष्ट केल्याशिवाय वैभव प्राप्त होत नाही

१६. थेंबे थेंबे तळे साचे – थोडे थोडे साठवत राहिले तरच त्याचा संचय होतो

१७. दाम करी काम – पैश्याने सर्व काम पूर्ण होतात

१८.दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसांमध्ये देखील दोष असतात

१९. दुरून डोंगर साजरे – लांबून सर्व गोष्टी चांगल्या दिसतात जवळ गेल्यावर त्याचे खरे स्वरूप समजते

२०. नाचता येईना अंगण वाकडे – आपल्यातील उणीव लपवण्यासाठी दुसर्याच्या गोष्टीला नाव ठेवणे

२१. आपलेच दात, आपलेच ओठ – आपल्याच लोकांच्या चुकीमुळे निर्माण झालेली अडचणीची परिस्थिती 

२२. आजा मेला, नातू झाला – घरातील एक माणूस गेला आणि दुसरा आला

२३. आईजीच्या जिवावर बाईजी उदार – दुसऱ्यांच्या पैशांवर मौज करणे 

२४. आगीतून निघून फोपाट्यात पडणे – लहान संकटातून निघून मोठ्या संकटात सापडणे.

२५. आकाशपाताळ एक करणे – मोठ्याने आरडाओरड करणे.

२६. आवळा देऊन कोहळा काढणे – खूप थोड्या मोबदल्यात दुसर्याकडून मोठे कार्य करून घेणे.

२७. इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे.

२८. इकडचा डोंगर तिकडे करणे – काहीतरी मोठा उद्योग करणे.

२९. उचलली जीभ लावली टाळ्याला –  कुठलाही विचार न करता बोलणे.

३०. उथळ पाण्याला खळखळाट फार – ज्ञान थोडेसे पण त्याचा गाजावाजा मात्र जास्त असणे

३१. उंदराला मांजर साक्ष – वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष असणे

३२. एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक गोष्ठी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.

३३. एका हाताने टाळी वाजत नाही – भांडणातील दोष एकाच व्यक्तीचे नसतात

३४. एकाच माळेचे मणी – सारख्या स्वभावाची सगळीच माणसे 

३५. ऐकावे जनाचे करावे मनाचे – अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.

३६. करावे तसे भरावे – वाईट कृत्य करणार्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

३७. कर नाही त्याला डर कशाला ? – अपराध न केलेला माणूस निर्भय असतो.

३८. कानामागून आली आणि तिखट झाली – श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.

३९. काखेत कळसा आणि गावाला वळसा – वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे.

४०. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस व निष्काळजीपणा करणे.

४१. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये – चांगल्या माणसांचा गैर फायदा घेऊ नये.

४२. कामापुरता मामा – काम होईपर्यंत गोड बोलणारी व्यक्ती.

४३. उठता लाथ बसता बुक्की – प्रत्येक कामात सारखी शिक्षा करीत राहणे.

४४. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या बोलण्याने श्रेष्ठ माणसांचे नुकसान होत नाही.

४५. एकाने गाय मारली म्हणून दुस-याने वासरू मारू नये – एकाने एक मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुस-याने लहानशी का होईना ती वाईट गोष्ट करू नये.

४६. कोळसा उगाळावा तितका काळांच – वाईट गोष्ट कितीही चांगली सांगण्याचा प्रयन्त केला  तरीही त्यांतून वाईटच निघणार.

४७. एक घाव दोन तुकडे – पटकन निकाल लावणे.

४८. एकदा कानफाट्या नाव पडले की पडले – लोकांमध्ये एखाद्याचे नाव वाईट झाले तर ते सुधारणे कठीण.

४९. एका पायावर तयार असणे – तत्पर असणे.

५०. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच – ज्याचा स्वभाव मूलतः वाईट आहे  तो सुधारणे कठीण

५१. कधी तुपाशी, कधी उपाशी – सांसारिक स्थितीत चढउतार असतोच.

५२. खाण तशी माती – आईवडीलांप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक असते.

५३. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – परिस्थितीशी जुळवून न घेता स्वतःच्या हट्टी मताप्रमाणे वागने

५४. गरज सरो वैद्य मरो – गरज संपल्यावर उपकार करणाऱ्याला विसरणे.

५५. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती – नाश होण्याची वेळ आली होती पण संकट टळले.

५६. उकराल माती तर पिकतील मोती – मशागत केली तरच चांगले पीक येते

५७. पी हळद हो गोरी – उतावळेपनाणे वागणे

५८. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळत नाही

५९. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाचे दिवस येतात.

६०. आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वतःचा फायदा पाहणे

६१. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते – एकाने काम करावे आणि दुसर्याने फायदा घ्यावा

६२. रात्र थोडी सोंगे फार – वेळ कमी आणि काम भरपूर

६३. आईचा काळ बायकोचा मवाळ – आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणे

६४. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस किंवा हलगर्जीपणा करणे

६५. ओळखीचा चोर जीवे न सोडी – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा जास्ती धोकादायक असतो.

६६. कोरड्याबरोबर ओले ही जळते – निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे

६७. औटघटकेचे राज्य – अल्पकाळ टिकणारी गोष्ट

६८. करीन ते पूर्व – मी करिन ते योग्य अशी वृत्ती असणे

६९. खोट्याच्या कपाळी गोटा – वाईट कृतीचा शेवट हि वाईट होतो

७०. गाढवाला गुळाची चव काय? – मूर्ख लोकांना चांगल्या गोष्टीची किंमत नसते

७१. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली – एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.

७२. गोगलगाय नि पोटात पाय – एखाद्याचे खरे रूप न दिसणे

७३. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे – स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याचे काम येणे

७४. चोर सोडून सान्याशाला फाशी – खर्‍या गुन्हेगाराला शिक्षा  न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.

७५. जशी देणावळ तशी धुणावळ – जेवढा मोबदला मिळतो तेवढेच काम करावे

७६. ज्याच्या हाती ससा तो पारधी – ज्याला यश मिळते तो महान

७७. टिटवी देखील समुद्र आटविते – सामान्य वाटणारा व्यक्ती देखील महान कार्य करू शकतो

७८.काकडीची चोरी फाशीची शिक्षा – लहान अपराध करणाऱ्याला मोठी शिक्षा देणे

७९. काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती – काही गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो

८०. डोंगर पोखरून उंदीर काढणे – खूप श्रम करून अल्प यश मिळणे

८१. देखल्या देवा दंडवत – खोटे खोटे केलेले स्वागत

८२. खऱ्याला मरण नाही – खरे कधीच लपून राहत नाही

८३. खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो त्याला भीती वाटत राहते

८४. जळे आणि हनुमान बेंबी चोळे – दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे

८५. ताकापुरते रामायण – आपले काम होईपर्यँत एखाद्याची खुशामत करणे

८६. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले – मूर्खपणा केल्याने एक हि गोष्ट साध्य न होणे

८७. देश तसा वेश – परिस्थितीप्रमाणे बदलणे

८८. नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे

८९.निंदकाचे घर असावे शेजारी – निंदा करणारे कोणीतरी असावे ज्यामुळे आपले दोष कळतात

९०. बडा घर पोकळ वासा – दिसायला फक्त श्रीमंत असणे

९१. भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी – एखाद्याने केलेल्या मदतीचा जास्ती फायदा घेणे

९२. भीक नको पण कुत्रा आवर – एखाद्याला मदत नाही केली तरी चालेल पण त्याच्या कामात अडथळा आणू नये

९३.मनी वसे ते स्वप्नी दिसे – मनात असलेल्या गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात

९४. अठरा विश्वे दारिद्र्य – अतिशय गरिबी.

९५.दगडावरची रेघ – न बदलणारी गोष्ट.

९६.गर्जेल तो पडेल काय – काही कृती न करता नुसते बोलणं

९७.लग्नाला गेली आणि बारशाला आली – खूप उशिराने पोहोचणे.

९८.रात्र थोडी सोंगे फार – कामे भरपूर पण वेळ थोडा असणे

९९. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार – आत जे नाही ते बाहेर कसे दिसेल.

१००. वरातीमागून घोडे – योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.

Leave a Reply