मराठी महिनीमधील मार्गशीष महिन्याला खूप महत्व आहे. कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीष महिना श्री कृष्णाला समर्पित आहे असे मानले जाते. तसेच ह्या महिन्यात येणाऱ्या गुरवार ला शुभ मानले जाते. ह्या वर्षी मार्गशीष महिन्याला बुधवार १३ डिसेंबर २०२३ पासून सुरवात होत आहे तर पहिला गुरवार १४ डिसेंबर २०२३ रोजी आहे . ह्या वर्षात ५ मार्गशीष गुरुवार असून शेवटचा गुरुवार ११ जानेवारी २०२४ ला आहे. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आल्याने तो गुरुवार करावा कि नाही यायबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पण श्रद्धेने हा गुरवार तुम्ही नक्कीच करू शकता.
मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. हे गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. लक्ष्मीदेवीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि संपत्ती येते.
मार्गशीष गुरुवार महालक्ष्मी व्रत पूजेची पद्धत (Margashirsha Guruvar)
- सर्वप्रथम सकाळी उठून सर्व कामे उरकून, आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे.
- श्रीगणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करून व्रत-उपासनेचा संकल्प करावा. चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीचा फोटो स्थापित करावा
- चोरांगाभोवती रांगोळी काढावी
- यानंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी, दुर्वा, अक्षता आणि नाणे टाकावे.हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या लावावीत.
- आता कलशावर पाच विड्याची,आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा
- नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवून त्यावर कलश स्थापित करा.
- आता हळद-कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करा.
- त्यानंतर देवीच्या फोटोला हळद आणि कुंकू लावून घ्यावे
- फुले, हार, अगरबत्ती आणि गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून लक्ष्मीची पूजा करा.
- देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई, खीर आणि फळे अर्पण करावीत
- व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी . देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करत राहावा .
- व्रताची कथा संपल्यानंतर देवी लक्ष्मीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा.
- दुसर्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे
- देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद-कुंकू वाहून नमस्कार करावा. अशी पूजा प्रत्येक गुरुवारी करावी
- शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. सुवासिनी बोलावून हळद-कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे माहात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते.
- आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात.
- हे व्रत करताना काही अडचण आली, तर पूजा-आरती दुसर्या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा.
गुरुवार हा श्रीदत्तगुरु-भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे.
संबंधित ब्लॉग
Ganpati Atharvashirsha – गणपती अथर्वशीर्षाचे फायद.
Swami Samarth Aarti – Swami Samarth Maharaj Aarti
Vivah Mangalashtak – संपूर्ण विवाह मंगलाष्टक