माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने निर्मित “पंचक” (Panchak) हा मराठी सिनेमा ५ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रद्रिष्ट होत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला येणाऱ्या मराठी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सिनेमा च्या नांवावरून तुम्हाला “पंचक” म्हणजे नक्की काय हा प्रश्न पडलाच असेल ना?
पंचक म्हणजे काय ? (What is Panchak in Marathi?)
ज्योतिषशास्त्रानुसार पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक (Panchak) असं म्हटलं जातं. ह्या काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पुढील काळात कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असतं असा समज आहे.
ह्या संकल्पनेवर आधारित आरएनएम मूव्हिंग पिक्चर्स निर्मित “पंचक” हा चित्रपट आहे. हि कथा लिहिली आहे राहुल आवटे यांनी आणि चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी. या चित्रपटात या सिनेमात दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, आनंद इंगळे, आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, नंदिता धुरी, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार पाहायला मिळतील.
टीझर बघून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. गंभीर परिस्थिती अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न ‘पंचक’ (Panchak) मधून करण्यात आला आहे. तर ह्या वीकएंड ला तुमचा सिनेमा ला जायचा प्लॅन करत असाल तर हा चित्रपट नक्की बघा.
source – youtube