पाव भाजी रेसिपी | Pav Bhaji Recipe Marathi | Mumbai Special Pav Bhaji

You are currently viewing पाव भाजी रेसिपी | Pav Bhaji Recipe Marathi | Mumbai Special Pav Bhaji

नुकताच हिवाळा सुरु झाला आहे अशातच काही गरमागरम आणि झणझणीत खायची इच्छा होत असते आणि बाजारात मटार सुद्धा यायला सुरवात झाली आहे . म्हणून आपण करायला सोप्पी अशी पाव भाजी (Pav Bhaji) कशी बनवायची ते पाहूया.

साहित्य

  • कांदे – ४-५ (बारीक चिरून )
  • बटाटे – ५-६ (उकडून घेतलेले)
  • टोमॅटो – ४-५ 
  • कौलीफ्लॉवर – १ वाटी
  • हिरवे वाटणे – १ वाटी
  • गाजर – १/२ वाटी
  • शिमला मिरची – १/४ वाटी
  • बीट – २-3 चमचे (कलर येण्यासाठी )
  • पाव भाजी मसाला – २ चमचे
  • हळद – १/४ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • बटर – आवडीप्रमाणे
  • पाव 

कृती

  • प्रथम हिरवे वाटणे,गाजर , कौलीफ्लॉवर , बीट उकडून घ्यावेत.
  • उकडलेले बटाटे किसून त्यात उकडलेल्या सर्व भाज्या घालून स्मॅश करून घ्याव्यात
  • नंतर एका मोठ्या कढई मध्ये बटर घालून त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा
  • कांदा गुलाबी रंग येईपर्यंत भाजत आला कि त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची घालावी. त्याने स्वाद खूप छान येतो
  • नंतर त्यात टोमॅटो ची पेस्ट घालावी
  • सगळे मिश्रण चांगले परतून घ्यावे
  • नंतर त्यात पावभाजी मसाला , हळद घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  • आता सर्व भाज्या थोडं पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून शिजवून घ्याव्यात
  • सजावटी साठी वरून कोथींबीर घालावी
  • पावला बटर लावून ते भाजून घ्यावेत 
  • अशी तयार आहे गरमागरम पाव भाजी (Pav Bhaji)

खाताना भाजी वर बटर, कांदा, लिंबू घालावे त्याने चव खूप छान येते.

Leave a Reply