Ram Navmi Wishes in Marathi – चैत्र शुक्ल नवमी ला रामनवमी साजरी केली जाते. श्री राम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला दुपारी १२ वाजता झाला, राम जन्म म्हणून रामनवमी साजरी केली जाते. भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणून देखील प्रभू रामचंद्राना ओळखले जाते. रामनवमी निमित्त शुभेच्छा पाठवण्यासाठी या संदेशांचा उपयोग होईल.
Ram Navami Wishes in Marathi
छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
संसारसंगे बहु शीणलों मी ।
कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!
ज्यांचा कर्म धर्म आहे
ज्यांची वाणी सत्य आहे
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची
सुरुवात नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
ही रामनवमी तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.
तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!