रेशन कार्ड माहिती  : प्रकार , फायदे आणि कसे काढावे | Ration Card Information in Marathi

You are currently viewing रेशन कार्ड माहिती  : प्रकार , फायदे आणि कसे काढावे | Ration Card Information in Marathi

Ration Card Information in Marathi : सध्या आधार कार्ड हे राहण्याच्या ठिकाणाचा पुरावा म्हणून वापरात असले तरी पूर्वी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड (Ration Card) महत्वाचे मानले जात होते. रेशन कार्ड चा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठी नाही तर नागरिकांना ओळख पटवण्यासाठी वापरले जाते. बँकेत खाते उघडण्यासाठी, शाळा, महाविद्यालयात घराचा पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डचा (Ration Card) म्हणजेच शिधापत्रिकेचा आजही वापर करण्यात येतो. ह्या रेशन कार्ड विविध प्रकार आहेत आणि ह्याच प्रकारानुसार धान्य वाटप केले जाते

रेशन कार्ड चे प्रकार कोणते? | Types of Ration Card

सरकारने चार रेशन कार्ड (Ration Card) ला मान्यता दिली आहे आणि ते रंगानुसार ओळखले जातात. उत्पन्न गटानुसार हे रेशन कार्ड दिले जाते.

१. निळ्या (Blue Ration Card)

२. गुलाबी किंवा केशरी (Pink/ Orange Ration Card)

३. पांढऱ्या (White Ration Card) आणि

४. पिवळ्या (Yellow Ration Card)

१. निळे व पिवळे रेशन कार्ड : दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी, गरीब लोकांसाठी रेशन कार्ड (Ration Card) निश्चित केलेले आहे. रेशन कार्ड चा रंग हा राज्यानुसार वेगळा असू शकतो . ज्या कुटुंबांकडे एलपीजी कनेक्शन नाही आणि वार्षिक उत्पन्न ६४०० (ग्रामीण) , 11,८५० (शहरी) त्यांना हे निळे, पिवळे रेशन कार्ड देण्यात येते.

२.गुलाबी किंवा केशरी रेशन कार्ड : सामान्य कुटुंबांसाठी व एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्रय रेषेखालील नागरिकांपेक्षा अधिक असणाऱ्या लोकांसाठी हे रेशन कार्ड (Ration Card) निश्चित केलेलं आहे . 

३. पांढरे रेशन कार्ड : आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याऱ्या लोकांसाठी हे रेशन कार्ड (Ration Card )निश्चित केलेले आहे. 

डिजिटल रेशन कार्ड काय आहे ? | Digital Ration Card

आता रेशन कार्ड  (Ration Card) हे डिजिटल केले आहे. एटीम सारखे दिसणाऱ्या डिजिटल रेशन कार्ड (Digital Ration Card) मध्ये एक चिप बसवलेली असते तसेच आता कुटुंब प्रमुख म्हणून कार्ड वर महिलेचे नाव टाकण्यात येते. हे डिजिटल रेशन कार्ड आधार कार्ड शी लिंक केलेले असते.

नवीन रेशन कार्ड कसे बनवावे? | How to Apply for New Ration Card

तुमच्याकडे जर  रेशन कार्ड (Ration Card) नसेल तर तुम्ही आता घरबसल्या मोफत रेशन कार्ड (Ration Card) काढू शकता. तसेच ऑनलाईन त्याचे स्टेटस चेक करू शकता. जुने कार्ड असल्यास आणि नवीन नाव नमूद करायचे असल्यास हि ऑनलाईन तुम्ही करू शकता. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक्य कागदपत्रांची गरज असते.

नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रोसेस | Steps to Apply Ration Card

१. रेशन कार्ड (Ration Card Online) काढण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://rcms.mahafood.gov.in/ वर जा.

२. त्यानंतर तिथे नवीन अकाउंट वर क्लिक करून विचारलेली माहिती भरा

३. आपला पासवर्ड सेट झाल्यानंतर लॉगिन करून नवीन रेशन कार्ड (Ration Card) साठी अर्ज वर क्लिक करा

४. आपल्याला एक फॉर्म दिसेल त्यात योग्य ती माहिती आणि योग्य ती कागदपत्रे जोडा.

५. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा. तुमचा अर्ज भरला गेल्यानंतर १०- १५ दिवसांनी पुन्हा लॉगिन करून स्टेटस चेक करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकता.

रेशन कार्ड साठी कोणती कागदपत्रे लागतात ? | Documents List For New Ration Card

1) राहत्या घराची वीज बिलाची छायांकित प्रत

२) रहिवासी बाबतचा पुरावा

३) स्वतःच्या घराचा उतारा किंवा कर पावती

४) उत्पन्नाचा दाखला

५) आधार कार्ड चे झेरॉक्स

६) मतदान कार्ड झेरॉक्स

७) राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले पासबुक

८) गॅस एजन्सीचा दाखला जर गॅस असेल

९) फोटो 

रेशन कार्ड (Ration Card ) आपल्या भारतामधील एक अति महत्वाचे एक सरकारी कागद पत्रक आहे, त्याचे अनेक फायदे असतात. आम्ही अपेक्षा करतो कि रेशन कार्ड काय आहे आणि त्याचे महत्व, आणि ते कसे काढावे कसावे , हि माहिती समजली असेल.

Leave a Reply