प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्न्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली होती. संपूर्ण भारतभर हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी भारताच्या राजधानी दिल्ली मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लालकिल्ल्यावर सकाळी ध्वजारोहणसोबत पंतप्रधानाचे भाषण सुद्धा असते. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढली जाते. भारताच्या कानाकोपऱ्यात प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जातो.
शाळा कॉलेज आणि कार्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय गायन भाषणे ह्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो.
प्रजासत्ताक दिनाचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे परेड ज्याला पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. पंतप्रधानांनी अमत जवान ज्योतीवर पुष्प अर्पण केल्यावरच परेड ला सुरवात होते. ह्या परेड च मुख्य आकर्षण म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौदला चा सहभाग.
राष्ट्रीय सणांपैकी एक महत्त्वाचा असलेला हा सण जगभरात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. फक्त साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही त्यासाठी आपण आपल्या देशाच्या प्रति अभिमान बाळगला पाहिजे.