नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्राती . ह्या सणाला तीळ गूळ घ्या आणि गॉड बोला असा संदेश देऊन एकमेकांना शुभेच्छा देण्याची एक पद्धत आहे. मकरसंक्रातीला तीळ (Sesame) आणि गूळ ह्याला विशेष महत्व आहे. म्हणूनच तिळाचे लाडू (Til ke Laddu) किंवा तिळाची बर्फी (Til Barfi )बनवली जाते. तर हेय तिळाचे लाडू (Til Ladoo) कसे बनवाचे हेय आज पाहुयात.
मकर संक्रांती स्पेशल तिल लाडू रेसिपी (Makar Sankranti Special Til Ladu)
साहित्य (Ingredients for Til Ladoo)
- पोलिश चे पांढरे तीळ (White Til)- १/२ किलो
- चिक्कीच गूळ (Jaggery) – १/२ किलो
- डाळे – १/२ वाटी
- भाजलेले शेंगदाणे (Peanuts) – १/२ वाटी
- सुक्या खोबऱ्याचा किस (Dry Coconut) – १/२ वाटी
- वेलदोड्याचे दाणे – ७-८
कृती (Recipe for Til Ladu)
- प्रथम तीळ भाजून घ्यावेत
- नंतर गुलाखेरीज सर्व वस्तू एकत्र करून त्याचे दोन भाग करावेत. गुळाचे हि दोन भाग करावेत.
- एका पातेल्यात गुळाचे तुकडे घालून गॅस वर ठेवावे. थोड्याच वेळात गूळ पातळ होईल
गूळ हलवत राहावे नाहीतर तो जळेल.
- गूळ चांगला पातळ झाला कि त्यात एक चमचा तूप घालून वरील तिळाच्या मिश्रणाचा एक भाग घालून, जरा हलवून एका ताटात ओतावा व लगेच छोटे छोटे लाडू वळावेत.
- असाच दुसरा भाग करून उरलेले लाडू करून घ्यावेत
- लाडू छान होतात.
तर ह्या मकरसंक्रातीला हि रेसिपी नक्की करून बघा आणि सणाचा आनंद वाढवा.