मकरसंक्राती हा नवीन वर्षाचा पहिला सण आहे. ह्या दिवशी एकमेकांना तीळ गूळ वाटून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ह्या दिवशी हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम असतो ह्यासाठी महिला वर्गामध्ये फार उत्साह असतो. ह्या कार्यक्रमामध्ये उखाणे घेण्याची हि पद्धत आहे. तर आज आपण मकरसंक्राती साठी नवीन उखाणे (ukhane for makar sankranti in marathi) पाहुयात
हळदी कुंकू साठी उखाणे | Ukhane for Haldi Kunku in Marathi
हळदी कुंकच्या दिवशी आले सगळे हौशी,
… रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी
सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
… रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ
नवीन वर्षात पहिला मन मकरसंक्रातीच्या
मेळा जमतो सुवासिनाचा
.. रावांचा आणि माझा जोडा राहो साताजन्माचा
आज आहे मकरसंक्रात
म्हणून केले जेवण गोड
… रावांची आहे मला
खूपच ओढ
मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा,
…रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा
Special Marathi Ukhane for Makar Sankrati
तिळगुळ दिल्याने दूर होतो नात्यातला कडवटपणा
… रावांचा नाव घेऊन मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा
तुळजापूरच्या तुळजाभवानीपाशी हळदी कुंकुवाच्या राशी,
… रावांच नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी
ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,
….रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी.
गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,
…रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.
काकवी पासून, बनवतात गुळ,
…रावांचे नाव घेऊन, वाटते मी तिळगुळ
संक्राती साठी उखाणे | Sankranti Special Marathi Ukhane for Female
संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना दिला तीळ आणि गूळ,
..रावांचे नाव घेताच पवित्र झालं माझं कुळ
तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान…
…रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.
चांदीच्या दिव्यात लावली तूपाची वात
… रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरूवात
हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध
… रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मींचे दृढ बंध
एका आठवड्यात, दिवस असतात सात,
… रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत
मकरसंक्रातीच्या समारंभासाठी उखाणे | Marathi Ukhane for Makar Sankranti Program
आयुष्याच्या करंजीत प्रेमाचे सारण,
… रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण.
सासरची माणसं माझ्या आनंदी आणि हौशी
… रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी
तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत
… रावांचा प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित
मंगलक्षण आला घरी दारी बांधले तोरण
… रावांचे नाव घेते हळदीकुंकू आहे कारण
पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनानी असावे श्रीमंत,
… रावांच नाव घेते आज आहे मकर संक्रांत.
मकर संक्रांतीच्या स्त्रियांचे हळदी कुंकवाचे उखाणे
मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकूवाचा घातल घाट ,
आमच्या … रावांचा आहे एकदम राजेशाही थाट
रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास
… रावांचा नाव घेते हळदी कुंकू आहे खास
संक्रांतीला मी सौभाग्य अलंकारनि नटते,
….रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते.
संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वान,
….रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान.
तिळाचा लाडू, खायला येते मज्जा,
…. रावांनी केला, माझ्या मनावर कब्जा.
मकर संक्रांतीचे मराठीमध्ये उखाणे | Makar Sankranti che Ukhane marathi female navri 2024
काळ्या साडीवर शोभून दिसते हलव्याची ठुशी
… रावांचे नाव घेते संक्रातीच्या दिवशी
तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा
…रावांचे नाव घेत सुखी संसाराचा मागते जोगवा
मोत्याची माळ सोन्याचा साज
…रावांच नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज.
शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून
… रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून
संक्रातीच्या सणाला सुगडाचा मन
…रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाच वाण