65 मुलींसाठी मराठी उखाणे | Ukhane Marathi For Female

You are currently viewing 65 मुलींसाठी मराठी उखाणे | Ukhane Marathi For Female

Marathi Ukhane for Female – उखाणे हा भारतीय विवाहाचा एक भाग आहे. नवीन जोडप्याचे लग्न झाल्यावर त्यांना घरात प्रवेश करताना 2 ओळी बोलाव्या लागतात. महिलांसाठी सोपे आणि अद्वितीय उखाणे मराठी (marathi ukhane for female) पहा. भारतीय संस्कृतीप्रमाणे काही परंपरांमध्ये लग्नानंतर, वधू आपल्या पतीचे नाव थेट घेत नाही, तिच्या पतीची ओळख करून देण्यासाठी स्त्रिया पतीचं नाव एका काव्यमय पंक्तीं मध्ये घेतात त्यालाच “उखाणा” (Ukhana) म्हणतात . हि प्रथा भारतामध्ये राज्यांनुसार बदलू शकते.

65 महिलांसाठी उखाणे मराठी – (Ukhane For Female)

उखाणे (Ukhane Female) म्हंटले कि मुली , बायका नवीन सर्रास उखाण्यासाठी उत्सुक असतात . ह्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत मॉडर्न मराठी उखाणे (Modern Marathi Ukhane for Female )कोणत्याही सण संभारंभासाठी .

1. जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, ….. रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा

2. लावित होते कुंकु त्यात पडला मोती…रावां सारखे मिळाले पती  त्याचे भाग्य मानू किती

3. मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण, …. रावांचे नाव घेते …. ची मी सून

4. खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद

5. शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, ___रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल

6. संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,*** रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला..

7. मंदिरात वाहते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान

8. डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, …… रावांच्या नावाने कुंकू लावते लाल

9. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …. रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने

10. उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल, …. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

11. आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश, …… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश

12. यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ….. रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब

13. एक तीळ सातजण खाई, …. रावांना जन्म देणारी धन्य ती आई

14. गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती, …. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

15. यमुना नदीत पडते ताजमहलाची सावली _ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

16. इंद्रधनुष्य पडते जेव्हा पावसात असते ऊन _ रावांच नाव घेते (आडनाव ) ची सून.

17. हिरवीगार झाड नदीच्या काठी … रावांचा नाव घेते खास तुमच्यासाठी

18. कपाळी लावली टिकली चंद्रकोर … रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर

19. चंद्राला बहुल सागराला येते भरती — रावांची आणि माझी अशीच राहो प्रीती

20. फुलांचा सुगहनध पानाशी लागे… रावांसोबत जुळले जन्मोजन्मीचे धागे

21. विद्येची देवता आहे शिव पार्वतीचे पुत्र… रावांच्या दिर्घआयुष्यसाठी भांडते मी मंगळसूत्र

22. संसाररूपी वृक्षाला बांधून प्रेमाचा झुला … रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला

23. मनातले नाव उखाण्यात घेताना शब्द जुळवत राहिले ___ रावांनी मला मात्र गोड बोलून फसवले.

24. माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

25. सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

26. शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात _ रावांची आणि माझी साता जन्माची साथ.

27. शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,….. रावांच्या प्राप्तीने माझे, भाग्य उदयाला आले

28. खडीसाखरेचा गोडी आणि चफ़्याचा सुगंध… रावांच्या संसारात मिळतो आनंद

29. हिमालय पर्वतावर आहेत बर्फाच्या राशी —– रावांचे नाव घेते —– च्या दिवशी.

30. पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते

31. संसाराच्या समुद्रात आपुलकीची होडी ___ रावांमुळेच आली माझ्या जीवनात गोडी.

32. गणपती समोर ठेवले लाडू- पेढे ___ रावांचे नाव घ्यायला कशाला एवढे आढे वेढे.

33. एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती, अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती

34. लग्नात लागतात हार आणि तुरे, …. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

35. ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

36. झाडावर बसलाय पक्षांचा थवा ___ रावांचे नाव घ्यायला उखाणाच कशाला हवा.

37. देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,…. रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

38. सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

39. मोगऱ्याचे झाड फुला फुलांनी दाटले ___ चे नाव घेताना आनंदी मला वाटले.

40. लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा

41. उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन, —— राव आहेत, माझे मोठे फॅन

42. सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,आमचे —— राव अजुन कसे नाही आले, गटारात पडले की काय

43. अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी

44. श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,… रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन

45. नाही नाही म्हणता म्हणता जुळले लग्न एकदाचे ___ रावांमुळे मिळाले मला सुख सौभाग्याचे.

46. शिवाजी राजांनी किल्ला जिंकला, शक्ति पेक्षा युक्ति ने,…. रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

47. काचेच्या वाटीत फळे ठेवली कापून _ रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.

48. जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,घडविले दैवांनी… रावांना जीव लावून

49. आकाशात शोभून दिसे चंद्राची कोर ___ रावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर.

50. काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ….. रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून

51. पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार ___ रावांच नाव घेते करून शिवरायांना नमस्कार.

52. हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत —— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

53. सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

54. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार

55. गुलाबाचे फुल दिसायला ताजे,… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे

56. काचेच्या वाटीत फळे ठेवली कापून ___ रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.

57. काचेच्या बशीत बदामचा हलवा,….. रावांचे नाव घेते, सासुबाईंना बोलवा

58. डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,… रावांचे नांव घेताना, आनंदी मला वाटले

59. देवीच्या मंदिराला सोन्याच्या कळस ___ राव आहेत सर्वांपेक्षा सरस.

60. चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,… रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा

61. नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी, ….. च्या घराण्यात ….. रावांची झाले महाराणी

62. तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे, —— रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.

63. नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा —— रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

64. शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

65. कवीची कविता मनापासून वाचावी _ रावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.

संबंधित ब्लॉग

मराठी उखाणे नवरदेवासाठी – मराठी उखाणे नवरदेवासाठी पहा

Trending Quotes

Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi

Trending Festive Blogs
Valentine Day Wishes in Marathi | Shiv Jayanti Wishes in Marathi

Leave a Reply