Women’s Day Wishes 2024 : जागतिक महिला दिनासाठी खास शुभेच्छा, Quotes

You are currently viewing Women’s Day Wishes 2024 : जागतिक महिला दिनासाठी खास शुभेच्छा, Quotes

Women’s Day Wishes : ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणीन साजरा केला जातो. एक स्त्री आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका बजावत असते कधी मुलगी, कधी सून, कधी बहीण तर कधी एक सासू म्हणून. एकावेळी अनेक भूमिका  बाजवणाऱ्या स्त्री चा सन्मान व्हावा ह्या हेतूने महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनाच्या दिवशी (Women’s Day Quotes) ठिकठिकाणी वेगळे वेगळे कार्यक्रम आयोजित करून स्त्रियांना सन्मानित केलं जाते. तर ह्या दिवशी स्त्रियांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Wishes for Women’s Day in Marathi.

Best Women’s Day Wishes, Messages in Marathi

जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, 

अशा प्रत्येक ‘ती’ला

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

ती आई आहे, ती ताई आहे,

ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,

ती पत्नी आहे, ती सून आहे,

ती सासू आहे, ती आजी आहे.

पण याआधी ती एक स्त्री आहे.

जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आहे नराची… नारी हीच शोभा आहे घराची… 

तिला द्या आदर, प्रेम, माया  

घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्या भरारीपुढे  गगनही ठेंगणे भासावे  

तुझ्या विशाल पंखाखाली  विश्व सारे वसावे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,

वेगवेगळ्या भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,

“ती” ला  महिला दिनाच्या शुभेच्छा.

कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर

स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,

झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, 

स्त्री म्हणजे क्षणाची साथ 

तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. 

जागतिक दिनाच्या शुभेच्छा.

स्त्री म्हणजे एक खडतर वाट… 

अशक्य ते शक्य करुन दाखविणारी 

अन्यायाला न्याय मिळवून देणारी  

जी बदलेल समाजाची वहिवाट

जागतिक दिनाच्या शुभेच्छा.

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,

तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,

म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण

संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!

स्त्री सर्व दुःख पचवू शकते पण तिच्या आत्मसन्मानावर

झालेला हल्ला कधीच पचवू शकत नाही

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!

तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो…

जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा

Trending Quotes

Nature Quotes in Marathi | Good Morning Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Love Quotes in Marathi | Marathi Love Quotes For Wife | Good Night Quotes in Marathi | Inspirational Quotes In Marathi | Attitude Status In Marathi

Ukhane

Funny Ukhane In Marathi | Ukhane Marathi For Female | Marathi Ukhane For Male

Leave a Reply